शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत एक कोटी 32 लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकअदालतीत विविध खटल्यातील तब्बल एक कोटी 32 लाख 64 हजार 354 रुपयांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, लोकअदालतीत प्रलंबीत 594 व दाखलपूर्व पाच हजार 291 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती.जिल्ह्यात लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. एकुण पाच पॅनल तयार करण्यात आले होते. पहिल्या पॅनलमध्ये जिल्हा न्यायामूर्ती आर.एस.गुप्ता, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकअदालतीत विविध खटल्यातील तब्बल एक कोटी 32 लाख 64 हजार 354 रुपयांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, लोकअदालतीत प्रलंबीत 594 व दाखलपूर्व पाच हजार 291 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती.जिल्ह्यात लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. एकुण पाच पॅनल तयार करण्यात आले होते. पहिल्या पॅनलमध्ये जिल्हा न्यायामूर्ती आर.एस.गुप्ता, अॅड.पी.डी.बागुल, डॉ.एन.डी.चौधरी यांचा समावेश होता. दुस:या पॅनलमध्ये दिवाणी न्यायमूर्ती वरिष्ठस्तर एस.डी.गायकवाड, अॅड.विनया मोडक, आर.एस.मोरे. तिस:या पॅनलमध्ये मुख्य न्यायादंडाधिकारी के.एफ.एम.खान, अॅड.एम.डी.मोरे, रेखा अहिरे, पॅनेल चार मध्ये कनिष्ठस्तर सह दिवाणी न्यायाधिश पी.एच.जोशी, अॅड.संजय पाटी, राजाभाई दिवाण यांचा तर पॅनल पाच मध्ये सह दिवाणी न्यायाधिश कनिष्ठस्तर जी.सी.गुप्ता, अॅड.एच.एम.गांगुर्डे, राणीबाई गावीत यांचा समावेश होता.जिल्ह्यात प्रलंबीत 594 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात फौजदारी 23, धनादेश अनादर 199, वैवाहिक वाद 155, बँक वसुली एक, मोटर अपघात 71, भुसंपादन 41, लेबर डिसपूट 10 तर इतर 94 प्रकरणांचा समावेश होता. दाखलपूर्व प्रकरणांची संख्या पाच हजार 291 होती. त्यात बँक वसुलीची दोन हजार 122, वीज बिलाची व पाणी पट्टीची दोन हजार 594 तर कर्ज प्रकरणे 575 इतकी होती. त्यातून दाखलपूर्व 100 तर प्रलंबीत 65 खटले निकाली काढण्यात आले. दाखलपूर्वमध्ये वीज थकबाकीचे 44 प्रकरणातून एक लाख 21 हजार 630 रुपये वसुली झाली. बँक थकबाकीचे तीन प्रकरणांमध्ये एक लाख 18 हजार, पाणी पट्टीच्या 38 प्रकरणांमध्ये एक लाख 32 हजार 55, ओबीसी महामंडळ व फायनान्स कंपनीच्या 11 प्रकरणांमध्ये 18 लाख 64 हजार 163 रुपये अशी एकुण 22 लाख 35 हजार 846 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. प्रलंबीत प्रकरणांमधून फौजदारी 19 प्रकरणातील 73 हजार 600 रुपये, धनादेश अनादर प्रकरणातील 22 केसमध्ये 30 लाख 99 हजार 908 रुपये, मोटर अपघातच्या 16 प्रकरणांमध्ये 78 लाख 55 हजार, वैवाहिक पाच व इतर तीन प्रकरणे असे सर्व एकुण एक कोटी 32 लाख 64 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. लोकअदालतीत आलेले दोन्ही पक्षकार, त्यांचे वकिल यामुळे न्यायालय परिसरात मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती.