शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या शहादा उपविभागाकडून वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक आह़़े त्यामुळे महावितरणकडूनही लक्षांकपूर्तीसाठी आता वसुलीवर जोर देत शेतक:यांच्या मागे तगादा लावण्यात येत आह़े महावितरणच्या शहादा उपविभागाकडून पाणीपुरवठय़ाच्या थकीत बिलांची वसुली करण्यात येत आह़ेशहादा उपविभागात पाच कोटी दोन लाख रुपयांची पाणीपुरवठय़ाचे वीज बिल थकीत आहेत़ त्यामुळे या थकबाकीदारांकडून आता बिलाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक आह़़े त्यामुळे महावितरणकडूनही लक्षांकपूर्तीसाठी आता वसुलीवर जोर देत शेतक:यांच्या मागे तगादा लावण्यात येत आह़े महावितरणच्या शहादा उपविभागाकडून पाणीपुरवठय़ाच्या थकीत बिलांची वसुली करण्यात येत आह़ेशहादा उपविभागात पाच कोटी दोन लाख रुपयांची पाणीपुरवठय़ाचे वीज बिल थकीत आहेत़ त्यामुळे या थकबाकीदारांकडून आता बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचा:यांची पथकेही स्थापन करण्यात आली आह़े काही शेतक:यांच्या शेतातील पाणीपुरवठादेखील खंडीत करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़ेआर्थिक वर्ष संपण्याला अवघे काही दिवस बाकी आहेत़ या पाश्र्वभूमिवर शासनाच्या सर्वच विभागाकडून आपले ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात येत असत़े महावितरणकडून यासाठी अधिकारी व कमचा:यांची पथकेही स्थापन करण्यात आली आहेत़ मागील वर्षी महाविरणकडून वसुलीचाच एक उपक्रम म्हणून ढोल वाजवून वसुली करण्याचा आगळावेगळा उपक्रमदेखील हाती घेण्यात आला होता़ ज्या शेतक:यांची कृषिपंपाची बिले, पाणीपुरवठय़ाची बिले थकीत आहे अशा थकबाकीदारांच्या घरासमोरच ढोल वाजवण्यात  आले होत़े याही वर्षी महावितरणकडून वसुलीसाठी            कुठल्या गोष्टींचा अवलंब करण्यात येतो हे बघणे महत्वाचे ठरणार              आह़े महावितरणच्या शहादा उपविभागात शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव असे चार तालुके येतात़ 625 ग्रामपंचायतींना महावितरणमार्फत पाणीपुरवठय़ाची कनेक्शन दिले आह़े शहादा तालुक्यातील 3 कोटी 60 लाख, अक्कलकुव्यात 30 लाख 35 हजार, धडगाव येथे 5 लाख 12 हजार तर तळोद्यात 1 कोटी 5 लाख असे एकूण चार तालुके मिळून पाच कोटी 2 लाख रुपयांची पाणीपुरवठय़ाची थकबाकी आह़े त्याच प्रमाणे हे चारही तालुके मिळून पथदिव्याचीदेखील 97 लाख 13 हजार रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळाली़ त्यात, शहादा येथील 221 गावे, तळोद्यातील 92 गावे, अक्कलकुवा येथील 112 गावे तर धडगाव येथील 239 गावांचा समावेश आह़े यासर्व ग्रामपंचायतींना बिल भरण्याबाबत नोटीसादेखील पाठविण्यात आल्या आहेत़ येत्या काही दिवसात बिल न भरल्यास वीजपुरवठा तसेच पाणीपुरवठा  खंडीत करण्याची कारवाई               करण्यात येईल असे सांगण्यात          आल़ेकृषिपंपाचीही थकबाकी.कृषिपंपाची वीज बिल वसूल करण्यासाठीही शेतक:यांना वेठीस धरण्यात येत आह़े शहादा उपविभागाअंतर्गत थकबाकीधारकांच्या एक हजार 200 कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात आली आह़े