शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डधारकांना रोख रक्कमऐवजी धान्यच द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:09 IST

नंदुरबार : राज्यात एपीडीएस योजना लागू करण्यात आलेली असून, त्यात संगणकीय वितरण प्रणालीतील दोष दूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ...

नंदुरबार : राज्यात एपीडीएस योजना लागू करण्यात आलेली असून, त्यात संगणकीय वितरण प्रणालीतील दोष दूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून शासनाने रेशनचे धान्य दुकानदारांना शंभर टक्के द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स असोसिएशन, नवी दिल्ली संचलित राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने शासन स्तरावर अनेक अडचणी मांडण्यात आल्या त्याचप्रमाणे बैठकाही घेण्यात आल्या. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही दुकानदारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते ते आजतागायत पूर्ण होऊ शकले नाही. नवीन सुधारित वाहतूक वितरण प्रणाली अंमलात आणून परवानाधारकांना द्वारपोच धान्य वितरण योजनेंतर्गत धान्य दुकानापयर्ंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु, याबाबत अंमलबजावणी होऊ शकली नाहीस्वस्त धान्य दुकानावरून धान्य देण्याऐवजी ग्राहकांना रोख रक्कम देण्यात येणार असल्याने रेशन व्यवस्था मोडीत काढण्याच्या शासनाच्या हेतू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन, जिल्हा संघटक बाबासाहेब राजपूत, सचिव कुणाल वसईकर, कार्याध्यक्ष अरविंद कुवर ,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गुरव,  जयसिंग माळी, आमशा पाडवी, सचिव महेंद्र चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख विजय चौधरी, प्रवक्ते डॉ. वासुदेव  शिंपी, उपसचिव देवा अल्हाटकर, देवा परशराम चौधरी, रवींद्र गिरासे, मनोहर बोडखे, जिग्नेश अग्रवाल, मनोज चौधरी, गणेश खेडकर, अण्णा पाटील, इंद्रसिंग वसावे, शुभम रघुवंशी, मोहन शर्मा, शंकर भाटिया, सलीम शेख, पिंटू नाईक, रवींद्र चौधरी, सुनील वैद्य आदींच्या स्वाक्षरी आहेत.शहादा व तळोदा येथेही आंदोलन करण्यात आले.