लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना रुग्णाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत जिल्हा राज्यात तळाला असल्याचे सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर हा सात ते आठच्या दरम्यान सिमित आहे. किमान १५ ते २० हा दर असणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात रुग्ण संख्येला आळा घालावयाचा असेल तर या कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता चार हजाराच्या घरात पोहचली आहे. दीड महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्ण आढळले आहेत. हा दर पाच पट इतका आहे.नंदुरबारात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प होती. एप्रिल, मे व जून महिन्यात सरासरी आकडा हा २५ ते ४० च्या दरम्यान राहिला. जुलै महिन्यापासून मात्र रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढत होत गेली. आजच्या स्थितीत दीड महिन्यात तब्बल पाच पट रुग्ण संख्या वाढली आहे. ४५ दिवसात आडेतीन हजार रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.केवळ सात जणांची तपासणीएक कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील किमान १५ ते १७ जणांची तपासणी करणे आवश्यक असते. तेव्हढ्या लोकांचा स्वॅब घेणे किंवा त्या लोकांनी स्वॅब देणे आवश्यक असते. परंतु नंदुरबार जिल्ह्यात सुरुवातीपासूनच केवळ सात ते नऊ जणांचीच तपासणी केली जात आहे. त्यामुळे सुरुवातीला बाधित आढळून येण्याचे प्रमाण देखील कमी होते. आत बाधितांची संख्या वाढलेली असतांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचीही संख्या वाढविणे आवश्यक असतांना तसे होत नसल्याचे दिसून येत आहे.स्वत:हून स्वॅब देणारे जास्तजिल्ह्यात भितीपोटी किंवा मानसिकतेतून स्वत:हून स्वॅब देणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: ग्रामिण भागातील लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवसाला आरटीपीसीआर च्या जवळपास अडीचशे ते तीनशे चाचण्या होत आहेत. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.आकडा चार हजार पारकोरोना बाधितांचा आकडा तब्बल चार हजार पार झाला आहे. १ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान साडेतीन हजार रुग्ण वाढले आहेत. ३१ जुलै रोजी ५४७ रुग्ण संख्या होती. ती १५ सप्टेबर पर्यंत तब्बल चार हजार ५३ इतकी आहे. ४५ दिवसात पाच पट रुग्ण संख्या वाढली आहे. जुलैच्या अखेर मृतांची संख्या ३१ होती ती १५ सप्टेबरपर्यंत तब्बल १०५ झाली आहे.जिल्ह्यात पहिल्या दोन महिन्यात अर्थात एप्रिल व मे महिन्यात कोरोना बाधीत रुग्ण संख्येचा दर हा महिनाभरात दुप्पट असा होता. जुलै महिन्यापासून तो तिप्पट झाला. आॅगस्ट ते १५ सप्टेबर या दरम्यानच्या ४५ दिवसात तो तब्बल पाच पट वाढला आहे. मृत्यू संख्या देखील तिप्पट वाढली आहे. येत्या काळात चाचण्या वाढविल्यावर बाधीत आणि मृतांची संख्या वाढणार आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर अवघा सात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:40 IST