घटनेचे वृत्त गावात पसरताच गावात खळबळ उडाली. काही काळ तणाव निर्माण झाला होता. संशयिताला त्वरित अटक करावी, अशी मागणी होती. घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन गावातील लोकांना शांततेचे आवाहन केले. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पीडीत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली. त्यावरून विश्वास रूपचंद साळुंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, तत्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे हे स्वतः करीत आहेत.
तणावाचे वातावरण पाहता संशयित आरोपीच्या घराजवळ तसेच गावात ठिकठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे.