लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गत दोन आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे 268 गावातील 1 हजार 400 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याने पंचनाम्यांना सुरुवात झाली आह़े यात शनिवार दुपार्पयत केवळ 94 गावांचे पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आह़े उर्वरित पंचनामे पुन्हा सोमवारपासून होण्याची शक्यता असली तरी पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ जिल्ह्यातील नंदुरबार, नवापुर, शहादा, धडगाव या चार तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याचा प्रशासनाचा दावा आह़े प्रशासनाने यासाठी तलाठींना सूचित करुन पंचनामे करण्याचे आदेश काढले होत़े शुक्रवारपासून या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली होती़ तत्पूर्वी मंडळाधिकारी व तलाठी यांना प्रशासनाने नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश काढले होत़े या आदेशानुसार जिल्ह्यात केवळ 268 गावांच्या शिवारातच नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता़ यात नंदुरबार 88, नवापुर 27, शहादा 54 तर धडगाव तालुक्यातील 99 गावांमध्ये अवकाळीची मार बसल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू अवकाळी पावसामुळे कापसाचे सर्वाधिक नुकसान झालेल्या तळोदा तालुक्याचा मात्र समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े अक्कलकुवा तालुक्यातही पावसाने हजेरी दिल्याने तेथेही नुकसान झाले आह़े परंतू प्रस्तावित नुकसानीच्या यादीत या दोन्ही तालुक्यातील एकाही गावांचे नाव समाविष्ट नसल्याचे प्रशासकीय कागदपत्रांवर दिसून आले आह़े जिल्ह्यात यंदा तब्बल 129 टक्के पाऊस आजअखेरीस झाल्यची माहिती आह़े यात सर्वच तालुक्यात अवकाळी बरसला असल्याने केवळ ठराविक गावांमध्येच नुकसान झाल्याचा आढावा घेण्यात आल्याने उर्वरित गावांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आह़े प्रशासनाकडून पंचनामे सुरु असल्याचे सांगण्यात येत असले तरीही त्यात नवीन गावांचा समावेश होणार किंवा कसे याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही़ शनिवारी जिल्ह्यातील विविध भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली होती़ तळोदा तालुक्यासह धडगाव आणि तोरणमाळ परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आह़े यातील पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे तात्काळ करण्याची मागणी शेतक:यांनी केली आह़े या प्रामुख्याने मका आणि कापसाचे नुकसान झाले आह़े
नंदुरबार तालुक्यात 165, नवापुर 222, शहादा 496 अशा 883 शेतक:यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाला देण्यात आली होती़ यात नंदुरबार तालुक्यात 375, नवापुर 60, शहादा 284 तर धडगाव तालुक्यात 686़24 हेक्टर अशा एकूण 1 हजार 405 हेक्टरवरच्या पिकांना अवकाळीची मार बसली आह़े यात शनिवार दुपार्पयत नंदुरबार तालुक्याच्या 13 गावात 20, नवापुर तालुक्याच्या 13 गावांमधील 145, शहादा तालुक्यातील 43 गावच्या 335 तर धडगाव तालुक्यातील 25 गावांमधील 125 शेतक:यांच्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले होत़े सायंकाळर्पयत हे पंचनामे सुरु राहणार असल्याने रात्री उशिरार्पयत आकडे येणार असल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू काही ठिकाणी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पंचनाम्यांच्या आकडेवारीत पुन्हा बदल होण्याची माहिती देण्यात आली आह़े