लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागासह सपाटीच्या गावांमध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे सात लाख गायी, म्हशी आणि शेळ्या व चार लाख कोंबड्यांची पावसाळी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे़ पशुसंवर्धन विभागाने सुरु केलेल्या उपक्रमांतर्ग पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे़पावसाळ्यात पाळीव गुरांना घटसर्प, फºया, आंत्रविषार आदी आजार होण्याची शक्यता असते़ यातून गुरे दगावून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भिती असल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळ्यापूर्वी लसीकरण मोहिम सुरु कºणयात आली आहे़ या मोहिमेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन समिती सभापती अॅड़ राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात प्रारंभ करण्यात आला आहे़ यांतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ९०७ गायी, ७२ हजार १०० म्हशी, २ लाख ७२ हजार ७५३ शेळ्या तर १५ हजार २७६ शेळ्या यांना लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे़ यासाठी घटसर्प आणि फºया यांच्या प्रत्येकी १ लाख २७ हजार ३०० तर आंत्रविषारसाठी ७२ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे़ पहिल्या टप्प्यात या लसी पाळीव गुरांना देण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया श्रेणी-एकच्या ४९, श्रेणी २ मधील ३६ तर राज्य शासनाच्या पाच चिकित्सालय आणि श्रेणी दोनच्या १४ पशु वैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकी, पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून गुरांना या लसी देण्यात येणार आहेत़केवळ पाळीव गुरे आणि शेळ्या मेंढ्यापर्यंत मर्यादीत न राहता विभागाने जिल्ह्याच्या विविध भागातील ४ लाख ९० हजार १९० कोंबड्यांची तपासणी करण्याचे नियोजन केले आहे़ या कोंबड्यांना पहिल्या टप्प्यात राणीखेत या आजारावर तीन लाख ६० हजार लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ़ शामकांत पाटील, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ़ के़टी़पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे़ तपासणीसाठी जिल्हाभर पशुवैद्यकांची पथके तैनात करण्यात आली असून त्यांच्याकडून कामकाज सुरु करण्यात आले आहे़
पशुसंवर्धन विभागाकडून ७ लाख पाळीव जनावरांसाठी पावसाळी लसीकरण मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:46 IST