शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

अवकाळी पावसाने उडवली दानादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व परिसरात शुक्रवारी सकाळी मध्यम ते तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व परिसरात शुक्रवारी सकाळी मध्यम ते तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकाला काहीसा फटका बसला. तर नंदुरबार बाजार समितीतील धान्य आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, दिवसभर वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे कमाल तापमान देखील ३२ ते ३३ अंशापर्यंत राहिले.जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणातील बदल दिसून येत आहे. कधी ढगाळ वातावरण राहत आहे तर कधी सोसाट्याचा वारा वाहत आहे.तुरळक ते मध्यम...शुक्रवारी सकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. काही भागात १० ते १५ मिनिटे तर काही भागात तीन ते चार मिनिटे पाऊस सुरू होता. मध्यम ते हलक्या स्वरूपाचा झालेला पावसाने अनेकांची धांदल उडविली. सकाळी हलक्या वातावरणात झालेल्या पावसामुळे वातावरणात अधीकच गारवा निर्माण झाला होता.धान्य व मिरचीचे नुकसाननंदुरबार बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवलेला व शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या धान्याचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. पावसाची कुठलीही शक्यता नसल्यामुळे व्यापाºयांनी नेहमीप्रमाणे उघड्यावर धान्य ठेवले होते. अचानक आलेल्या पावसामुळे धान्य उचलण्यास वेळ न मिळाल्याने धान्याचे नुकसान झाले. त्यात मका, हरभरा, सोयाबीन यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय शहरातील वळण रस्ता आणि दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या मिरची पथारींवरील मिरचीलाही या पावसाचा मोठा फटका बसला. पावसात मिरची भिजल्याने मिरची काळी पडण्याची शक्यता आहे. शिवाय मिरची सडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मिरची व्यापाºयांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.शेतातील पिकांचे नुकसानशेतात काढणीवर आलेले हरभरा आणि गहू पिकाचेही या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेला हरभरा पावसात भिजला आहे. शेतीमाल सुरक्षीतस्थळी हलविण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही.पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी घसरले आहे. मंगळवार, ३ मार्च रोजी ३६ अंशावर गेलेले तापमान शुक्रवारी ३१ ते ३२ अंशावर घसरले होते.किमान तापमान देखील १८ ते २१ अंशापर्यंत होते. होळीपर्यंत वातावरणातील हे बदल कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.