प्रकल्प तुडूंब भरल्याने रब्बीची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:32 PM2020-09-28T12:32:20+5:302020-09-28T12:32:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने सर्वच ...

The rabbi's concern was allayed when the project was filled to the brim | प्रकल्प तुडूंब भरल्याने रब्बीची चिंता मिटली

प्रकल्प तुडूंब भरल्याने रब्बीची चिंता मिटली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने सर्वच नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्यांच्यातील पाण्याचा विसर्ग करावा लागला. या सर्व परिस्थितीमुळे यंदा जिल्ह्यातील सहा मध्यम व ३६ लघु प्रकल्पातील सरासरी पाणीसाठा हा ८५ टक्केपेक्षा अधीक झाला आहे. अद्याप परतीचा पाऊस बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी पाणीसाठा १०० टक्केपेक्षा अधीक जाऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यंदा जून व जुलै महिन्यात अपेक्षीत पाऊस झाला नव्हता. पावसाची तूट तब्बल ३८ टक्केपर्यंत पोहचली होती. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. परंतु आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाने जोरदार बॅटींग केली. परिणामी तूट भरून निघण्यास मदत झाली. सर्वच तालुक्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले दुथडी भरून वाहिले, काही अद्यापही वाहत आहेत. परिणामी जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्वच प्रकल्प ओव्हफ्लो झाले आहेत. काही भरण्याच्या मार्गावर आहेत.
रब्बीला फायदा
सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा समाधानकारक असल्याने यंदा रब्बीची चिंता मिटली आहे. शिवाय उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या देखील बºयाच प्रमाणत कमी झाली आहे. गेल्या पावसाळ्यात देखील सर्वच प्रकल्प तुडूंब भरल्याने रब्बी हंगाम चांगला आला होता. यंदा अती पावसामुळे अनेक भागातील खरीप वाया गेला आहे. त्यामुळे आता खरिपापासून शेतकऱ्यांना आस लागली आहे.
जिल्ह्यात रब्बीचे ७५ हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्र आहे. साधारणत: गहू, हरभरा, दादर काही भागात मका व बाजरी ही पिके घेतली जातात. शिवाय दोन तालुक्यांमध्ये कांदाही मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. खरीप हातातून जात असतांना आता रब्बीवर शेतकºयांच्या आशा टिकल्या आहेत.
काही प्रकल्पांना गळती
जिल्ह्यातील काही प्रकल्पांची दूरवस्था झाली आहे. तर काहींमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे त्यांच्यातील पाणी वाया जात आहे. अनेक प्रकल्पात वर्षानुवर्षापासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे असे प्रकल्प लागलीच भरले जातात. तर काही प्रकल्पांच्या बांधकामाला अनेक वर्षा झाल्याने त्यांन भेगा पडून त्यातून पाणी वाया जात आहे. परिणामी असे प्रकल्प डिसेबर, जानेवारी महिन्यातच कोरडे होतात. त्यात धडगाव, शहादा तालुक्यातील प्रकल्पांचा समावेश आहे.
येत्या काळात तरी अशा प्रकल्पांची दूरूस्ती व्हावी, त्यांच्यातील गाळ काढला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


जिल्ह्यातील रंगावली, शिवण, दरा, राणीपूर, भरडी, पळशी हे मध्यम प्रकल्प पुर्णपणे भरले आहेत. यातील शिवण, रंगावली, दरा प्रकल्पातून एक ते दोन वेळा पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ३६ लघु प्रकल्पातील नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील आणि शहादा तालुक्यातील आठ प्रकल्पांमध्ये ४० ते ६० टक्के पाणी साठा आहे. परतीच्या पावसात या प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढू शकेल.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील बलदाणे अर्थात अमरावती नाला प्रकल्प गेल्यावर्षी ५० टक्केपेक्षा अधीक भरला होता. यंदा हा प्रकल्प ४० टक्केपर्यंतच भरलेला आहे.

Web Title: The rabbi's concern was allayed when the project was filled to the brim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.