शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात एक क्विंटल प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 13:14 IST

पालिकेची कारवाई : चार व्यापा:यांना 20 हजारांचा दंड

तळोदा : प्लास्टिक पिशाव्य व वस्तू विक्री बाबत सातत्याने सूचना देवून ही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या विक्री केली जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर येथील पालिका प्रशासनाने अचानक व्यावसायिक प्रतिष्ठांवर धाडी टाकून त्यांच्या कडील एक क्विंटल प्लास्टिकच्या वस्तू व पिशाव्य जप्त केल्या. शिवाय या चार ही व्यापा:यांवर 20 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली. पालिकेने अचानक धाडी टाकल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र यात पालिकेने सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे जनजागृती बरोबरच विक्री बाबत व्यावसायिकांना सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. शिवाय काही दिवसाच्या पूर्वी व्यापा:यांकडून कॅरी बैग सुध्दा जप्त केल्या आहेत, असे असताना प्लास्टिक पिशाव्य  व वस्तुंची सर्रासपणे विक्री केली जात असल्याची माहिती पालिकेस मिळाली होती. त्यानुसार पालिकेने गुरुवारी अचानक धाड टाकली. सुरुवतीस पालिकेने आपल्या कर्मचा:यास ग्राहक म्हणून एका दुकानात पाठविले तेथे प्लास्टिकच्या वस्तू मागीतल्या असता या दुकान मालकाने वस्तू देताच इतरांनी धाड टाकली. अशाच प्रकारे इतर व्यापा:यांकडेही धाडी टाकून त्यांच्याकडून प्लास्टिक वस्तू व पिशाव्य जप्त करण्यात आल्या. श्रीकृष्ण स्टोर्स, जय बालाजी, रामदेव किराणा, राधा कृष्ण किराणा अशा चार दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या. या व्यावसायिकांकडून एक क्विंटल प्लास्टिकच्या वस्तू जप्त करुण साधारण 20 हजराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई स्वत: मुख्याधिकारी जनार्दन पवार, कार्यालय अधीक्षक राजेंद्र सैंदाणे, विजय सोनावणे, राजेंद्र माळी, मोहन माळी, प्रशांत ठाकूर, मनोज परदेशी यांनी केली. दरम्यान जप्त केलेल्या प्लास्टिकच्या वस्तुंची स्वर्ग रथात प्रेतयात्रा काढून पालिकेच्या कचरा डिपोत त्याचे दहन करण्यात आले.