उमेदवाराचा दिवस कसा सुरू होतो, त्यांचे दिवसभराचे प्लॅनिंगकसे असते, कार्यकर्त्यांना कशा सूचना देतात, काय सूचना देतात? त्यांच्या प्रचारदौऱ्यात ते लोकांशी काय संवाद साधतात, कोणती आश्वासने सतत देतात, जनता त्यांच्याकडे काय मागणी करते, काय काय किस्से या चर्चांदरम्यान घडतात? अशा सर्वांचा धांडोळा घेण्यासाठी लोकमतचे प्रतिनिधी संतोष सूर्यवंशी यांनी आघाडीचे उमेदवार अॅड़ के़सी़ पाडवी यांच्या प्रचाराच्या एका दिवसाचे केलेले हे लाईव्ह रिपोर्टिंग...विद्यमान आमदार व काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड़ के़सी़ पाडवी यांचे कार्यालय ‘या-बा’ निवास, विजयश्री नगर, होळतर्फे हवेली येथे सकाळपासून कार्यकर्त्यांचा गराडा असतो़ प्रचाराला निघण्याआधी दिवसभराचे प्रचाराचे नियोजन कार्यकर्त्यांना सांगण्यात येत असते़ कार्यकत्यांशी संवाद साधून प्रचाराची दिशा ठरविण्यात येत असते़ अॅड़ पाडवी यांची तळोद्यात रॅली असल्याने त्या ठिकाणच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी सतत मोबाईलवर संपर्क साधण्यात येत होता़रॅलीव्दारे घेतले मतदारांचे आशिर्वादअॅड़ के़सी़ पाडवी यांच्या नंदुरबार येथील कार्यालयातून निघालेला ताफा सकाळी ११ वाजेच्या सुमारास तळोदा येथे धडकला़ प्रवासा दरम्यान, अॅड़ पाडवी हे मोबाईलव्दारे सतत तळोद्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते़ तळोदा येथील रॅलीत त्यांनी विविध भागातील मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे र्आिशर्वाद घेतले़ या वेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते़ रस्त्यात येणारे मंदिर, मशिद आदींमध्ये जावून त्यांनी आशिर्वादही घेतले़काँग्रेस काळातील विकासाचा मांडला लेखाजोखातळोद्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रचार दौरा झाल्यानंतर अॅड़ के़सी़ पाडवी यांचा ताफा दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहाद्यात धडकला़ या ठिकाणी प्रचार रॅली काढल्यानंतर त्यांची शहादा शहरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सभा झाली़ या सभेत त्यांनी काँग्रेस काळातील विकासाच्या विविध योजना, पूर्ण झालेली कामे आदींचा लेखाजोखा मांडला़ तसेच निवडूण आल्यानंतर कुठल्या कामांना प्राधान्य देण्यात येईल याचीही सविस्तर माहिती दिली़ सभा आटोपल्यानंतर त्यांनी लोकांमध्ये जात त्यांच्या समस्या, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या़
मुलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावावेत : एक दिवस उमेदवारासोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:45 IST