शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शहाद्यात अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाटय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:57 IST

शहराची होतेय कोंडी : सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांचा अतिक्रमण काढण्याला पाठींबा

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करीत पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व सदस्यांनी अतिक्रमण काढण्याची एकमुखी मागणी         केल्याने शहाद्यातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.शहादा शहर हे विकसनशील शहर असून, चोहोबाजुंनी शहराची वाढ होतआहे. पूव्रेकडे लोणखेडा बायपास रोडच्या पलिकडे नागरिकांच्या  वसाहती पोहोचल्या आहेत. पश्चिमेकडे मनरदर्पयत तर उत्तरेस मलोणीर्पयत शहराचा विस्तार झाला आहे. दक्षिणेला भेंडवा नाल्यार्पयत लोकवसती झाली आहे.  एकंदरीतच शहराची चोहोबाजुने वाढ होत आहे. मात्र असे असले तरी  शहरात दिवसेंदिवस  वाढणारे अतिक्रमण ही मोठी समस्या आहे. शहराच्या विस्ताराबरोबरच अतिक्रमणाचादेखील विस्तार होत असल्याने संपूर्ण शहरात अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत  आहे. बसस्थानक परिसर, नगपालिका परिसर, दोंडाईचा रोड, जुना मोहिदा रोड, प्रकाशा रोड, मेनरोड, डोंगरगाव रोड, खेतिया रोड, पाडळदा चौफुली अशा सर्वच भागात अतिक्रमण हात-पाय पसरत असल्याने शहराचे विद्रूपीकरणाबरोबरच शहराची शांतताही धोक्यात आली आहे. अतिक्रमणा सोबतच अवैध व्यवसायही फोफावत असल्याने शहर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून शहरात दंगली सारख्या घटना घडल्याचा इतिहास असल्या कारणाने अतिक्रमणावर पुन्हा एकदा हातोडा चालविण्याची वेळ आली आहे.बसस्थानक परिसर आणि भाजी मंडईतील अतिक्रमण पालिकेने काढूनही या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाल्याने रहदारीची कोंडी होते. बसस्थानकासमोरील टप:या, लॉ:यांचे आणि दुकानांसमोर लावलेल्या वाहनांमुळे बसचालकांना कसरत करावी लागते. डोंगरगाव रोडवर पुन्हा टप:यांचे अतिक्रमण वाढत असून, अवैध वाहतुकीच्या वाहनांची यात भर पडत असून, या रस्त्यावरही रहदारीची कोंडी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळार्पयत लॉरीधारकांच्या अतिक्रमणाने हा रस्ता दुहेरीमार्ग असूनही या रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होते. पालिकेच्या समोरील चौक टप:यांच्या अतिक्रमणाने भरला असून, नेहमी या चौकात किरकोळ कारणावरून वाद होतात. स्टेट बँक चौकातील भाजी व्यवसायिकांच्या गाडय़ा आणि मोहिदा रोडवरील खाद्य पदाथ्र्याच्या गाडय़ांनी झालेल्या अतिक्रमणामुळे वाहनचालक, नागरीक सारेच त्रस्त झाले आहेत. मेनरोड व नेहरू चौकातील अतिक्रमणामुळे या रस्त्यावरून चार चाकी वाहने चालूच शकत नाही, अशी स्थिती आहे.अतिक्रमणाच्या समस्येने संपूर्ण शहर ग्रस्त झाले असून, शहरभर रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अस्थायी अतिक्रमणासोबतच शहरात स्थायी अतिक्रमणेदेखील मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भर रस्त्यात घरे, दुकाने आणि प्रार्थन स्थळांचे मोठ-मोठे अतिक्रमण झाल्याने रस्ता असूनही अनेक ठिकाणी त्या रस्त्याचा वापर करता येत नाही. अतिक्रणाची ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत असल्याने पालिका प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटातील सदस्यांनी अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करून अतिक्रमण काढण्याची एकमुखी मागणी केल्याने प्रशासनाने विनाविलंब अतिक्रमणाच्या समस्येवर रामबाण उपाय करणे आवश्यक आहे.