शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन बाजारानुसार मिळणार भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 11:33 IST

5 ई-मंडीचा औपचारिक शुभारंभ : पहिल्या दिवशी इंटरनेटला अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय ई-मंडी योजनेअंतर्गत नंदुरबार बाजार समितीत ऑनलाईन लिलाव करण्यात आले. सुरुवातीला कनेक्टीव्हिटीची अडचण आणि देशभरातील इतर बाजार समितींमध्ये याअंतर्गत प्रलंबीत असलेले काम यामुळे पहिल्या दिवशी केवळ औपचारिक शुभारंभ करण्यात आला. परंतु आजपासून शेतक:यांच्या शेतामालाचा वाहनातच लिलाव करण्यास सुरुवात झाली आहे.देशभरात गुरुवार 21 सप्टेंबरपासून ई-नाम प्रणाली अंतर्गत बाजार समितींमध्ये ऑनलाईन लिलाव सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 30 बाजार समितींची निवड करण्यात आली असून त्यात विभागातून नंदुरबार बाजार समितीचा समावेश आहे. या योजनेचा औपचारिक शुभारंभ गुरुवारी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती भरतभाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शेतकी संघाचे बी.के.पाटील, उपसभापती अनिल गिरासे, संचालक डॉ.सयाजीराव मोरे, सचिव योगेश अमृतकर आदी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत बाजार समितीला दहा संगणक, एलईडी स्क्रीन आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता बाजार समितीच्या गेटवरच वाहनाची ऑनलाईन नोंदणी केली जाईल. ते वाहन थेट बाजार समिती आवारात उभे करण्यात येईल. संबधित व्यापारी शेती मालाची क्वालिटी पाहून त्यानुसार वाहनातच लिलाव करतील. अर्थात त्यासाठी संगणक आणि मोबाईल अॅप्समध्ये राज्य किंवा देशातील संबधीत मालाला जेव्हढा भाव असेल तो देण्याचा प्रय} राहील. अर्थात त्यासाठी शेतक:यांनी देखील चानाक्षपणे ई-मंडीअंतर्गत असलेला भाव पहाणे आवश्यक राहणार     आहे. वाहनात लिलावानंतर तो माल संबधित व्यापा:याच्या प्लॉटवर नेण्यात येईल. त्यामुळे शेतकरी दुपार्पयत किंवा सायंकाळर्पयत आपल्या घरी परत जावू शकणार आहे. सध्याच्या अर्थात पारंपारिक लिलाव पद्धतीत गर्दीच्या वेळी शेतक:यांना किमान एक ते दोन दिवस बाजार समितीत लिलावासाठी थांबावे लागत होते.कनेक्टीव्हिटीची अडचणराज्य व देशभरात अद्यापही या बाजार समित्या एकमेकांशी पुर्णपणे जोडल्या गेलेल्या नाहीत. आणखी 20 टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी इंटरनेट कनेक्टीव्हिटीला मोठय़ा अडचणी आल्या होत्या. तरीही त्यातून मार्ग काढत येथील बाजार समितीत त्याची सुरुवात करण्यात आली. चेकद्वारे पेमेंटशेतक:यांचा विक्री करण्यात आलेल्या शेतीमालाचे पेमेंट हे ऑनलाईन किंवा चेकने परस्पर बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतक:यांना येतांना बँक पासबूकची ङोरॉक्स व आधारकार्ड आणणे आवश्यक ठरणार आहे. यामुळे कॅशलेश व्यवहाराचाही उद्देश साध्य होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाटापूर्वी पारंपारिक तोलाईमध्ये शेतकरी काही प्रमाणात नाडला जात असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु आता इलेक्ट्रॉनिक वजनकाटा राहणार   आहे. त्यात शेतमाल भरलेले वाहन आणि शेतमाल खाली करून आलेले वाहन यांचे वजन करून एकुण शेतमालाचे वजन काढले जाणार आहे. त्यामुळे तोलाईबाबत होणा:या तक्रारीही काही प्रमाणात कमी होणार आहेत.