सरपंच पाटील, महिला सदस्य व ग्रामसेवक हे गावात स्वत: लक्ष ठेवून असतात. त्यामुळे हे शक्य होते. शेजारील गावातील ग्रामस्थांना लसीकरणासाठी प्रवृत्त करीत आहेत. इच्छाशक्ती असली तर महिलासुद्धा कर्तव्यात पुरुषांपेक्षा पुढे जातात. याचे उदाहरण म्हणजे पुरुषोत्तमनगरचे देता येईल.
जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. अशा कौतुकामुळे मला काम करण्याची स्फूर्ती येते. त्यामुळे अशी चांगली कामे माझ्या हातून घडतात. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीचा येथे फारच कमी स्पर्श होऊ दिला. प्रत्येक घरोघरी जावून जनजागृती मोहीम राबवल्यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यात सर्वात जास्त ऑक्सिजन असणारे गाव असून, येथे येणारा प्रत्येक व्यक्ती हिरवळ पाहून भारावून जातो. त्यामुळे या गावाचे नेहमीच कौतुक होत आहे.