शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

पालिका कर्मचा_यांना धक्काबुक्की : तळोदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 11:40 IST

अतिक्रमणधारकांची पथकावर दादागिरी, महिला आल्या अंगावर धावून

तळोदा : शहरातील रामगड परिसरात पालिकेच्या जागेवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर अतिक्रणधारकांनी दादागिरी करीत शासकीय कामात अडथळा आणला़ पालिकेच्या अधिका:यांशी अतिक्रमणधारक महिलांनी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर धावून गेल्याने   बघ्यांची गर्दी झाली होती़तळोद्यातील रामगड येथे पालिकेच्या जागेवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आह़े पालिका पथकाने गुरुवारी या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्याचे नियोजन केले होत़े यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, बांधकाम अभियंता शंकर गावीत, बांधकाम लिपीक नारायण चौधरी यांच्यासह पालिकेचा फौजफाटा शहरातील रामगड भागातील पालिकेच्या जागेवर गेला होता़ या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पक्के तसेच पत्र्याच्या शेड टाकून वस्ती वसवण्यात आली आह़े पहिले घर इम्रान निसार अन्सारी याचे असल्याने पालिका पथकाने अतिक्रमण काढण्याची कार्यवाहीला सुरुवात करताच परिसरातील अतिक्रमणधारक व महिला पथकावर धावून आल्या़ या ठिकाणी त्यांनी पथकातील अधिका:यांशी हुज्जत घालत धक्काबुक्कीदेखील केली़ अनेक महिला बांधकाम अभियंता गावीत यांच्या अंगावर धावून आल्या़ पथकावर दगडफेकअतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचा:यांवर तसेच बुलडोजरवर अतिक्रमणधारकांनी मोठय़ा प्रमाणात दगडफेक केली़ पालिका कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे दगडफेक करण्यात आल्याने सर्वसामान्यांकडून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आह़े त्यामुळे अतिक्रमणधारकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आह़े यावेळी अतिक्रमणधारक आक्रमक झाल्याने मोठय़ा प्रमाणात धावपळ उडाली होती़ बघ्यांचीदेखील मोठी गर्दी झाली होती़ दरम्यान, रामगड परिसरतील सर्वच घरे उठविण्यात येणार असल्याची अफवा पसरल्याने परिसरातील सर्व नागरिक पोलीस ठाण्यात दाखल झाले होत़े प्रकरण हाताबाहेर जात असल्याने पालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार, बांधकाम अभियंता गावीत यांनी तुर्त कार्यवाही थांबविण्याचा निर्णय घेतला़ पोलीस ठाण्यात महिला पुरुषांचा जमाव आल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जमावाला शांत केल़े पालिका अधिका:यांना पाचारण केल़े पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, बांधकाम अभियंता शंकरराव गावीत, नारायण चौधरी, योगेश चौधरी, नगरसेवक कलीम अन्सारी आदींसमवेत चर्चा करण्यात आली़ 2011 पूर्वीचे सर्व अतिक्रमण शासकीय आदेशान्वये नियमानुकूल करण्यात येणार असल्याचे त्यांना आम्ही हातही लावणार नाही, पालिकेकडून वारंवार सूचना व नोटीसा  देऊनही संबंधित दाद देत नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आल़े त्याच बरोबर 2011 नंतर करण्यात आलेले सर्व अतिक्रमण कायद्यानुसारच काढण्यात येत असल्याने मुख्याधिकारी पवार यांनी सांगितल़े