शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमधील दारू धडगाव तालुक्यातून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील जलोला येथे पंजाबमध्ये विक्रीचा परवाना असलेला अवैध दारूसाठा पोलीसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतला़ पावणे नऊ लाखांच्या दारूसह 10 लाखांचा ट्रक पोलीसांनी ताब्यात घेत कारवाई केली आह़े मोलगी पोलीसांच्या पथकाने जलोला ता़ धडगाव येथे ही कारवाई केली़ ट्रक रस्त्यात उभा करून तो खाली करण्याचे काम मजूर करत ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील जलोला येथे पंजाबमध्ये विक्रीचा परवाना असलेला अवैध दारूसाठा पोलीसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतला़ पावणे नऊ लाखांच्या दारूसह 10 लाखांचा ट्रक पोलीसांनी ताब्यात घेत कारवाई केली आह़े मोलगी पोलीसांच्या पथकाने जलोला ता़ धडगाव येथे ही कारवाई केली़ ट्रक रस्त्यात उभा करून तो खाली करण्याचे काम मजूर करत होत़े पोलीस याठिकाणी गेले असता ट्रकचालक आणि मजूर पसार झाल़े मोलगी पोलीस ठाण्याचे पथक सोमवारी सकाळी एका गुन्ह्यातील फरार आरोपी गुलाबसिंग पारता वसावे याच्या शोधात पिंपरापाणी येथे गेले होत़े याठिकाणी गुलाबसिंग हा मिळून आला नाही़ तो जलोला येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली़ यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शिरसाठ, मुंगल्या पाडवी हे जलोला येथे जात असताना 11़45 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला आऱज़े11 जी़ए़ 1947 या ट्रकमधून खोके खाली उतरवले जात असल्याचे दिसून आल़े त्यांनी चौकशी केली असता, मजूर आणि ट्रकचालक यांनी पळ काढला़ पोलीसांनी ही माहिती धडगाव आणि मोलगी पोलीस ठाण्यात दिली़ या ट्रकमधील मालाची पाहणी केली असता, आठ लाख 74 हजार 800 रूपयांचे विदेशी मद्य आढळून आल़े पोलीसांनी हा ट्रक धडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून कारवाई केली़ मुंगल्या पाडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला़ कारवाईमुळे खळबळ उडाली आह़े