शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आश्रमशाळांच्या स्थलांतरास विरोध : दहेल व कंकाळामाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:28 IST

पालकांचा प्रकल्प कार्यालयावर ठिय्या

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील दहेल व कंकाळामाळ या दोन शासकीय आश्रमशाळांच्या स्थलांतर विरोधात तेथील आदिवासी पालकांनी शनिवारी प्रकल्पात तब्बल चार तास ठिय्या मांडला होता. या वेळी पालकांनी शाळा स्थलांतराबाबत अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले होते. शाळांचे स्थलांतर रद्द झाल्याशिवाय ठिय्या मागे न घेण्याचा पवित्रा पालकांनी घेतल्यानंतर याप्रकरणी पालकांना विश्वासात घेवून एक समिती नेमून जागेची पाहणी केली जाईल. मात्र या शाळा पुन्हा तेथेच भरण्याचे            आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. तथापि                कडक उन्हात पालकांनी तब्बल चार तास प्रकल्पासमोर ठिय्या मांडला होता.भौतिक सुविधांच्या अभावामुळे तळोदा आदिवासी एकात्मिक विभाग प्रकल्पाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आपल्या कार्यक्षेत्रातील धडगाव तालुक्यातील झापी, सिंदीदिगर, तेलखेडी, त्रिशुल, शेलगदा या पाच तर अक्कलकुवा तालुक्यातील दहेल, कंकाळामाळ, गमन, नाला, खडकापाण या पाच अशा एकूण 10 शासकीय आश्रमशाळांचे स्थलांतर त्या-त्या तालुक्यात केले आहे. तथापि डनेल व कंकाळामाळ या शाळा ज्याठिकाणी स्थलांतर झाल्या आहेत. तेथेदेखल भौतिक सुविधांची वानवा आहे. ज्या इमारती आहेत तेथे खोल्या अपूर्ण आहेत. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा         संख्येने विद्यार्थी राहू शकणार नाही. त्यामुळे विद्याथ्र्याच्या सुरक्षेचा प्रश्ननिर्माण होणार आहे. या शाळांचे स्थलांतर रद्द करून पुन्हा तेथेच           शाळा सुरू कराव्यात यासाठी आदिवासी पालकांनी शनिवारी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेत तेथे तब्बल चार तास ठिय्या मांडला होता. या वेळी प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांनी पालकांच्या समोर येवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. या वेळी पालकांनी चांगले धारेवर धरले          होते.वास्तविक शाळा स्थलांतर केलेल्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. तेथील हातपंप बंद असल्यामुळे जवळील नाल्यावर आंघोळीसाठी विद्याथ्र्याना जावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. इमारतीचा प्रश्न असल्यामुळे शाळांचे तात्पुरते स्थलांतर केल्याचे प्रकल्पाधिकारी गौडा यांनी पालकांना सांगितले. शिवाय जागांचा प्रस्तावदेखील संबंधित वन विभागाकडे परवानगीसाठी पाठविला आहे. मात्र पालकांचे यावर समाधान झाले नाही. कारण शासकीय जागे बरोबरच खाजगी जागा दान देण्याचा प्रस्ताव प्रकल्पाकडे गेल्या अनेक वर्षापासून दिला आहे. त्यावर अजूनही प्रकल्पाने कार्यवाही केली नाही. अन् आता अचानक शाळा स्थलांतर केल्याने पालक अधिकच संतप्त झाले होते. भौतिक सुविधांबाबत आतापावेतो प्रकल्पाने उदासिन धोरण घेतले होते. आम्ही आमची घरे शाळांसाठी देतो मात्र या शाळांचे स्थलांतर रद्द करावे, अशी मागणी पालकांनी प्रकल्पाधिका:यांसमोर केली. पालकांनी मागणी मान्य होई पावेतो ठिय्या मागे न घेण्याचा          प्रवित्रा घेतल्यानंतर प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांनी स्थलांतराविषयी पालक व अधिका:यांची समिती नियुक्त करून ही समिती जागेची प्रत्यक्ष पाहणी केल. त्यानंतरच स्थलांतराचा निर्णय घेतला जाईल. मात्र शाळा जुन्या ठिकाणीच            पूर्ववत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात आदिवासी अधिकार मंचचे दयानंद चव्हाण, मोग्या भिल, नवनाथ ठाकरे, अंजू पाडवी, जगन मोरे, आटूबाई वसावे, सुनील पाडवी, कृष्णा पाडवी, कालूसिंग ठाकरे आदींसह पालक सहभागी झाले होते.