लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह इमारतीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा घटनेचा जिल्ह्यातील विविध संघटनांनी निषेध व्यक्त करण्यात आला. या बाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.७ जुलै रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानावावर दोन अज्ञात व्यक्तींनी भ्याड हल्ला केला व निवासस्थान परिसराची नासधूस करून घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकारामुळे आंबेडकरी अनुयायी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व आंबेडकर कुटुंबास झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नंदुरबार येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अरूण रामराजे, नानासाहेब ठाकरे, उद्धव पिंपळे, सुरेश जगदेव, संजय पाटील, पुष्पाबाई वानखेडकर, सुनील सूर्यवंशी, पंकज जाधव, आप्पा बैसाणे, बाजीराव धनगर, गौतम ठाकरे, नानाभाऊ जगदेव, अॅड.संदीप महिदे, आरिफ सरवर खान पठाण, सुरेश कुवर, गजेंद्र निकम, दिनेश सामुद्रे, रविभाऊ मोरे, राजेश मेटकर तर एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी जिल्हा प्रमुख रवींद्र सोनवणे, उपप्रमुख राकेश जाधव, गणेश सोनवणे, तालुका प्रमुख सचिन फटकाळ आदी उपस्थित होते. तसेच आरपीआय एकतावादीचे जिल्हाध्यक्ष दीपक बागले, पी.आर.पी.चे जिल्हाध्यक्ष रसिकलाल पेंढारकर, आॅल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सौरभ सरोदे, भिमपूत्र युवासेना संस्थापक अध्यक्ष अमोल पिंपळे, आरपीआयचे सुनील साळवे, कैलास पेंढारकर उपस्थित होते.तळोदा येथे जयभिम नवयुवक मंडळ, ब्लु टायगर बॉईज व लहुजी वस्ताद सोशल ग्रुपच्या वतीने तळोदा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर सुनील खैरनार, अनिल पवार, नितीन गरूड, आनंद शिंदे, सुभाष शिंदे, हंसराज महाले, राकेश सावळे, सिध्दार्थ नरभवर, प्रविण नरभवर, प्रविण नरभवर, मनोज खैरनार, ईकबाल अन्सारी, सुपियान बागवान, आकाश सोनवणे, शरद सावळे आदीच्या सह्या आहेत.शहादा येथे नंदुरबार जिल्हा आर.पी.आय आठवले गट, सिध्दार्थ युवा मंच व पँथर गृपच्या वतीने शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांना निवेदन दिले. या वेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, उपाध्यक्ष अनिल कुवर, समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, आकाश कुवर, रोहीत कुवर, रोहीत आहिरे, अक्षय जगदेव, विकास कुवर उपस्थित होते.
राजगृहावरील हल्ल्याचा जिल्ह्यातून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:48 IST