शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यापासून मिळणार संरक्षण : सरदार सरोवर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:43 IST

घराचा पाया बांधकामासाठी प्रकल्प बाधितांना निधी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 :  सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या जिल्ह्यातील 12 पुनर्वसाहतीमधील 1 हजार 736 लाभाथ्र्याना घराच्या पायासाठी नर्मदा विकास विभागाने साधारण 10 कोटींचा निधी मंजूर केला आह़े त्यामुळे या वसाहतधारकांचे पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळणार आह़े दहा वर्षानंतर का होईना शासनाने विस्थापितांची मागणी पूर्ण केल्याने  समाधान व्यक्त केले आह़े महाकाय सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या साधारण साडेचार हजार प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन जिल्ह्यातील देवमोगरा, नर्मदानगर, देवानगर, सरदारनगर, रोझवा पुनर्वसन, गोपाळपूर, त:हावद, वडघील, वाडी, कायर्दे आदी 12 वसाहतींमध्ये करण्यात आले आह़े तथापि सदर विस्थापितांच्या घरास पक्का पाया नसल्याने त्यांना नेहमीच पावसाळ्यात नदीच्या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागत असतो़ कारण पुराचे पाणी घरात शिरत असल्याने त्यांचे अन्नधान्याबरोबरच संसारउपयोगी वस्तूंचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होत अस़े अलीकडच्या पाच वर्षापासून तर ही समस्या अधिकच बिकट होत होती़ त्यामुळे साहजिकच वसाहतींची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी पाहणा:या नर्मदा विकास विभागाकडे निधीबाबत सातत्याने मागणी करण्यात आली होती़ यासाठी विस्तापितांना धरणे, मोर्चे आदी पध्दतीने आंदोलने करावी लागली होती़ या प्रकरणी जिल्हा प्रशासन व संबंधित नर्मदा विकास विभागाने 1 हजार 736 लाभार्थीच्या 17 कोटी 18 लाख 64 हजार रुपयांच्या प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या वर्षी शासनाकडे पाठविला होता़ शिवाय निधीबाबत सातत्याने पाठपुरावाही केला होता़ या पाश्र्वभूमिवर नर्मदा विकास विभागास त्यातून साधारणत 10 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आह़े या विभागानेही त्यातील अर्धी रक्कम म्हणजे प्रत्येक लाभार्थीस 49 हजार रुपये अनुदान उपलब्ध करुन दिले आह़े गेल्या दहा वर्षानंतर का असेना शासनाने विस्थापितांना घराच्या पायाची रक्कम उपलब्ध करुन दिल्यामुळे बाधितांच्या चेह:यावर हास्य खुलले आह़े पुराच्या पाण्याची मोठी बिकट समस्या विस्थापितांसमोर निर्माण झाली होती़ दरम्यान, गौण खनिज अर्थात वाळूबाबत शासनाने अनेक जटील अटी लागू केल्यामुळे महसूल प्रशासनाकडूनही शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जात आह़े कारवाईच्या भितीपोटी ठेकेदारांनीसुध्दा वाळू वाहतूक थांबविली आह़े परिणामी बांधकामेही ठप्प झाली आहेत़ वाळू मिळत नसल्याने हा व्यवसायच प्रभावित झाला आह़े नर्मदा विकास विभागाने प्रकल्पग्रस्तांना घराच्या पायासाठी रक्कम उपलब्ध करुन दिली असली तरी त्यांच्यापुढे वाळूचा मोठा प्रश्न निर्माण झाला आह़े कारण वाळूच मिळत नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी घराचा पाया कसा पूर्ण होईल? अशी व्यथा काही प्रकल्प बाधितांकडून विचारण्यात येत आह़े वाळू मिळाली नाही तर यंदाही पुराचा सामना करावा लागेल अशी भितीही व्यक्त करण्यात येत आह़े काही प्रकल्पग्रस्तांनी वाळूसाठी येथील महसूल प्रशासनाचे भेटही घेतली होती़ मात्र त्यातून अजूनही मार्ग निघाला नसल्याची माहिती आह़े गेल्या आठवडय़ातही वाळूसाठी तालुक्यातील सरपंचांनी तहसीलदारांना साकडे घातले होत़े