शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर वनक्षेत्रात अभयारण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:56 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : डांग जिल्ह्यात विस्तीर्ण पसरलेल्या घनदाट जंगल परिसराला तालुक्याच्या पश्चिम भागातील विकसीत होणा:या राखीव जंगलाची जोड मिळत आह़े यामुळे दोन राज्यांच्या सिमावर्ती भागात राष्ट्रीय अभयारण्य होण्यास पोषक वातावरण निर्माण झाली असून हा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यासाठी प्रय} सुरू करण्याची गरज आह़े याअंतर्गत वनविभाग केंद्रीय वनमंत्रालयाकडे अभयारण्य निर्मितीचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती आह़े  पश्चिम घाटाची सुरुवात नवापूर तालुक्यातील कारेघाट लक्कडकोट येथून झाली आहे. गुजरात हद्दीलगत तालुक्याच्या सिमावर्ती पश्चिम भागात वनसंपदेची पूवार्पार होत आलेली हानी गत 10 वर्षांत भरुन निघाली आहे. यातून येथे सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रात वनसंपदा बहरली आहे. वनसंरक्षण समित्या सक्षमपणे कामे करुन जंगलाचा सांभाळ करीत आल्याने वनांचे वास्तविक स्वरुप आता पुन्हा नव्याने समोर येत आहे. तडस, बिबट, रानडुक्कर, मोर, ससे, वानर, कोल्हे यांच्यासह इतर असंख्य प्राण्यांचा वावर लक्कडकोट ते चरणमाळ घाटातील प्रतापपूर वनक्षेत्र व डांग जिल्ह्यातील लगतच्या भागात दिसून आले आह़े या क्षेत्रात वनसंपदा वाढीस आली आहे. लगतच्या गुजरात वन हद्दीत सुबीर, काकशाळा व मलंगदेव या सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्रात जंगलाचा सांभाळ सुनियोजित पध्दतीने झाला असल्याने दोन राज्यांचा हा सीमावर्ती भाग वनसंपदेने बहरला आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे भर ऊन्हातही तग धरुन असल्याने जंगलात वास्तव्य करणा:या वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय होत आली आहे. दोन राज्यांचा सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्र राखीव वन क्षेत्र असुन राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित होण्यास येथे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जंगलात वास्तव्य करणा:या प्राण्यांना हक्काचे स्थान मिळण्यासह त्यांच्या वास्तव्यामुळे मनुष्यास निर्माण होणारा धोका कमी होण्यास मदतच होणार आहे. शिवाय वनसंपदेचे रक्षण करणेही सोयीचे ठरु शकेल.