शेतकऱ्यांचे आर्थिक साक्षरता प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:04 PM2020-02-25T14:04:51+5:302020-02-25T14:05:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँकेतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. ...

Promoting financial literacy of farmers | शेतकऱ्यांचे आर्थिक साक्षरता प्रबोधन

शेतकऱ्यांचे आर्थिक साक्षरता प्रबोधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँकेतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातून ३६ गावात ८० पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येवून आर्थिक व्यवहारात साक्षरतापर प्रबोधन करण्यात आले.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) तसेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला़ सदर पथनाट्यातून आर्थिक साक्षरता, शेतीसाठीचे कर्ज, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, बँकेच्या संदर्भात येणारे फसवणूकीचे खोटे संदेश आणि कॉल, एटीएम विषयी जनजागृती, अटल पेन्शन योजना, बँकेचे अपघात विमा तसेच बँकेकडून घेतलेले कर्ज वेळोवेळी फेडण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. या पथनाट्याचे लेखन हर्षल परदेशी यांनी केले तर नागसेन पेंढारकर यांनी दिग्दर्शन केले. पथनाट्यात विनोद ब्राम्हण, मोहिनी आगळे, वैशाली तडवी, राणी बागुल, ईश्वर पवार, दिनेश साबळे, अविनाश वसावे, काशिनाथ सूर्यवंशी, मंगेश वळवी, विकास वळवी, कमलेश गावीत या कलावंतांनी सहभाग नोंदवला़ सादरीकरणावेळी नाबार्डचे राहुल पाटील, विभागीय अधिकारी दंगल आबा पाटील, अजय मोरे, अनिल सिसोदिया, प्रभाकर चकोर उपस्थित होते.
या उपक्रमातून शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही नाबार्डचे अधिकारी आणि जिल्हा बँकेच्या अधिकाºयांकडून देण्यात येत होती़ उपक्रमामुळे शेतकºयांना बºयाच गोष्टींची माहिती मिळून प्रबोधन झाल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Promoting financial literacy of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.