शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आश्वासने हवेतच, नेत्यांनाही पडला विसर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:26 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्हा निर्मिती व त्यापूर्वीच्या काळात अर्थात गेल्या तीन दशकात परिसराच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्हा निर्मिती व त्यापूर्वीच्या काळात अर्थात गेल्या तीन दशकात परिसराच्या विकासासाठी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा नेत्यांनी केली असली तरी या तीन दशकात त्या योजना मात्र प्रत्यक्षात आकारास आलेल्या नाहीत. गंमतीची बाब म्हणजे या घोषणा आता नेत्यांच्या राजकीय अजेंड्यावरुनही गायब झाल्या आहेत. सोमवारी जागतिक विसरभोळे दिवस साजरा होत असताना या घोषणांची मात्र प्रकर्षाने जनतेला आठवण येत आहे.नंदुरबार स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी जिल्हा निर्मितीची मागणी ७० च्या दशकात सुरू झाली. प्रत्यक्षात मात्र जिल्हा निर्मितीचे स्वप्न १९९८ ला साकार झाले. पण जिल्हा निर्मितीच्या विषयामुळे परिसरातील विकासातील अनेक प्रश्न चर्चेत आले. जिल्हा निर्मितीची मागणी होत असतानाच या नव्या जिल्ह्यात मोलगी आणि म्हसावद हे दोन स्वतंत्र तालुके व्हावेत ही मागणी होती. १९९३ मध्ये स्व.गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते असताना नंदुरबार जिल्ह्यातील त्यांच्या सभांमध्ये हा विषय त्यांनी आवर्जून चर्चेत आणला होता. त्यानंतरही विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हा विषय होता. नंदुरबार जिल्हा निर्मितीची मुहूर्तमेढ होत असताना त्यावेळी देखील यासंदर्भातील आश्वासने देण्यात आली. एवढेच नव्हे तर पिंपळखुटा, ता.अक्कलकुवा येथे तत्कालिन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनीदेखील यासंदर्भातील आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा विषयच चर्चेला आला नाही. किंबहुना त्याबाबतची चर्चाही आता थांबल्यासारखीच आहे.सातपुड्यातील वन्यजीव रक्षणासाठी ९० च्या दशकात वनविभागाने तोरणमाळ अभयारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाचे निमित्तही तेवढेच मोठे होते. कारण तोरणमाळला लागूनच मध्य प्रदेश शासनानेही नवीन अभयारण्याचा प्रस्ताव तयार केले होते. ते एकत्रित करून आशिया खंडातील सर्वात मोठे राष्टÑीय उद्यान साकारण्याचे हे स्वप्न होते. त्या काळातील दोन लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आला. आता मात्र त्याचा सर्वांनाच विसर पडला आहे. असाच एक सोलापूर-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गाचा प्रश्नाची आठवण आता कुणालाही नाही. गेल्या चार वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक नवीन राष्टÑीयमहामार्ग घोषित केले. जिल्ह्यातील रस्त्यांचाही विस्तार व नवीन महामार्गाची घोषणा केली पण सातपुड्याच्या विकासाला चालना देणारा सोलापूर-अहमदाबाद राष्टÑीय महामार्ग मात्र दुर्लक्षित राहिला.नंदुरबारला औद्योगिक वसाहतीची घोषणा जिल्हा निर्मितीपूर्वी झाली. त्याचे दोनवेळा तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अखेर आता तिसऱ्यांदा जागा बदलून काम सुरू आहे. ही औद्योगिक वसाहत होण्यापूर्वीच येथे चिलीपार्क उभारण्याची घोषणा होती. आता जिल्ह्यातील मिरचीचे अस्तित्वच धोक्यात येत असताना चिलीपार्क कालबाह्य झाला. त्यानंतर डायमंड पार्कची घोषणा झाली. पण सुरतचा हिरा उद्योग संकटात आल्यानंतर ती घोषणाही बाजूला पडली.एकूणच जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील अनेक योजना, अनेक घोषणा गेल्या तीन-साडेतीन दशकात झाल्या. काही अजूनही चर्चेत तग धरुन आहेत तर काही मात्र काळाच्या पडद्याआडच विस्मृतीला जात आहेत. जागतिक विसरभोळे दिनानिमित्त नव्याने हे प्रस्तावित प्रकल्प नेत्यांच्या स्मृतीत यावेत, अशी अपेक्षा जिल्हावासी व्यक्त करीत आहेत.