शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील दलित वस्त्यांचा विकास लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:50 IST

एकाच गावात दोन समाजमंदीरासाठी निधी : अडीच कोटीचा निधी मिळूनही संथ

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, ग्रामीण भागातील अनुसचित जातीच्या वस्तीत सुधारणा अर्थात दलित वस्ती सुधारणा योजनेत 2016-17 या वर्षात मंजूर केलेली विकासकामे यंदा मार्च अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता मावळली आह़े या योजनेसाठी दोन कोटी 51 लाख 67 हजार रूपयांची भरघोस तरतूद करूनही विकासकांना गती मिळालेली नाही़ प्रामुख्याने नंदुरबार आणि शहादा या दोन तालुक्यातील मोठय़ा गावांमधील दलित वस्त्यांकडून आलेल्या प्रस्तावानंतर ही कामे मंजूर करण्यात आली होती़ लोकसंख्यानिहाय वर्गवारी असलेल्या या गावांना रस्ते काँक्रिटीकरण, बंदीस्त गटार, समाजमंदीर, संरक्षक भिंत आणि हायमस्ट लॅम्प उभारण्याच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ यातील बहुतांश कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, अद्यापही 80 टक्के कामे अपूर्ण असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात येत आह़े यात विशेष म्हणजे गेल्या 2015-16 मध्ये कामे मंजूर झालेल्या गावांचा पुन्हा समावेश करून त्यांना पुन्हा त्याच प्रकारच्या कामांचा निधी देण्याचा प्रकारही उघडकीस आला आह़े विशेष म्हणजे जिल्हास्तरावर समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे ठोस अशी कोणतीच माहिती उपलब्ध नाही़ 2016-17 या वर्षात नंदुरबार तालुक्यात हाटमोहिदे, समशेरपूर व नगाव  येथे समाजमंदिर,  कोपर्ली, कार्ली, ढंढाणे येथे बंदीस्त गटार, ढंढाणे, खोक्राळे, लहान शहादा, करजकुपे, धुळवद, धानोरा, रनाळे व दुधाळे येथे कॉक्रिट रस्ते आणि  सिंदगव्हाण संरक्षक भिंत बांधण्याच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ यापैकी ब:याच ठिकाणी कामांना रडतखडत सुरूवात होऊन मध्ये कामे बंद पडली होती़ ही कामे पुन्हा नव्याने सुरू होऊन आता पूर्णत्वास येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े या कामांसाठी एकूण खर्च 62 लाख 23 हजार 877 रूपयांचा निधी मंजूर होता़ योजनेंतर्गत शहादा तालुक्यातील मोहिदे तर्फे शहादा, जयनगर, सुलतानपूर, अनरद, वरूळ  व लोंढरे येथे नवीन समाजमंदिर, मोहिदे त़श दोन ठिकाणी काँक्रिट रस्ता, लोणखेडा एकता नगर वॉल कंपाऊंड व समाजमंदिर, वरूळ आंबेडकर नगर काँक्रिट रस्ता, अनरद येथे समाजमंदिर दुरूस्ती व दोन ठिकाणी काँक्रिट रस्ता , कलसाडी, सोनवद तर्फे शहादा, पुरूषोत्तम नगर, कुरंगी येथे काँक्रिट गटार व रस्ता,  धांद्रे कॉक्रिट रस्ता, चिखली बुद्रुक व दिगर काँक्रिट रस्ता, अंबापूर, सोनवद त़श येथे काँक्रिट रस्ता निर्माण करण्यासाठी अडीच लाख ते 10 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात होता़ ही कामे 80 टक्के पूर्ण झाल्याचा दावा शहादा पंचायत समितीकडून करण्यात येत आह़े प्रत्यक्षात अद्यापही 50 टक्के विकासकामे प्रलंबित असल्याची माहिती दलित वस्त्यांमधील ग्रामस्थ देतात़