रोझवा पुनर्वसन येथे प्रतिमा पूजन
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे विश्व आदिवासी दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी पोलीस पाटील नभा पावरा, माजी सरपंच जयराम पावरा, मालसिंग पावरा, मुख्याध्यापक मणिलाल नावडे यांच्याहस्ते याहामोगी माता व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नावडे यांनी केले. यावेळी माजी सरपंच जयराम पावरा यांनी आपल्या मनोगतात कोविड १९ च्या प्रादुर्भावात आपली जिल्हा परिषद शाळा जरी बंद होती तरी शिक्षकांनी ऑनलाईन, ऑफलाईन विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवल्याबद्दल विशेष कौतुक केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भारतसिंग पावरा यांनीही मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमास दादला पावरा, सायका पावरा, बावा पाडवी, उदेसिंग तडवी, ठगा पावरा, रमेश पावरा, वीरसिंग महाराज, विठ्ठल पावरा, ग्रामपंचायत सदस्य विजय पावरा, भरतसिंग पावरा, कबीर पावरा, बारक्या पावरा, प्रताप पावरासह युवक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भरतसिंग पावरा व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. आभार अशोक तितरे यांनी मानले.
बोरद येथे प्रतिमा पूजन
बाेरद, ता.तळोदा येथील बिरसा मुंडा चौकात आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी कोविड महामारीत गावातील मयतांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी मंगलसिंग चव्हाण, दत्तात्रय पाटील, मंगेश पाटील, दयानंद चव्हाण, सुकलाल ठाकरे, पंचायत समिती सदस्य विजयसिंग राजपूत, कालू तेली, जुल्फीकार तेली, योगेश पाटील, अनिल राजपूत, पोलीस दूरक्षेत्राचे विजय ठाकरे, लक्ष्मण कोळी, पोलीस एकनाथ ठाकरे, आदी उपस्थित होते.