शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

उत्पादक आणि ग्राहकांचा यंदा ‘कांदा करणार वांधा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कांदा उत्पादक केंद्र शासनाच्या निर्यातबंदीच्या निर्णयावर पूर्णपणे नाखूश आहेत़ यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ५० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कांदा उत्पादक केंद्र शासनाच्या निर्यातबंदीच्या निर्णयावर पूर्णपणे नाखूश आहेत़ यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ५० हजार क्विंटलपेक्षा अधिक कांदा पडून आहे़ हा कांदा बाजारात येत असला तरी पावसाळी कांद्याचे उत्पादन यंदा कमी होणार असल्याची चिन्हे आहेत़ परिणामी कांदा दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे़नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळी हंगामात १ हजार ८२२ हेक्टरवर कांदा लागवड करण्यात येते़ पावसाळी हंगामात हीच लागवड निम्म्यावर येते़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा पडून आहे़ परंतू या कांद्यांला आता निर्यातबंदी निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे़ गेल्या काही महिन्यात कांद्याचे वाढते दर शेतकºयांना दिलासा देणारे ठरत होते़ यातून पावसाळी कांदा लागवडीत काही अंशी वाढ झाली आहे़ परंतू गेल्या दोन-चार दिवसात पावसाने जोर धरला असल्याने कांदा खराब होण्याची शक्यता बळावत आहे़ नंदुरबार तालुक्यातून परजिल्ह्यात विक्रीसाठी जाणाºया कांद्याचे दर पडण्यास सुरूवात झाल्याची माहिती देण्यात येत आहे़ यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत़ पावसाळी कांद्याचे उत्पादन येण्यास अद्याप एक महिन्याचा कालावधी आहे़ यातून कांदा दर स्थिरस्थावर न झाल्यास शेतकºयांना आणि ग्राहकांना येत्या काळात मोठा फटका बसणार असल्याचे गणित कृषी तज्ञ मांडू लागले आहेत़ नंदुरबार बाजार समितीत कांदा लिलावाची प्रक्रिया होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा प्रामुख्याने नाशिक जिल्हा आणि मध्यप्रदेशातील इंदौरपर्यंत विक्रीसाठी जात आहे़ मात्र येथेही भाव पडू लागल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसत असल्याची माहिती समोर येत आहे़नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील २५ गावांमध्ये कांदा उत्पादनाला प्राधान्य दिले जाते़ या गावांमध्ये सध्या ५० हजार क्विंटलच्या जवळपास कांदा पडून आहे़ नंदुरबार बाजारात १० ते १५ रुपये प्रतिकिलो तर नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत २५ रूपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात येत आहे़ या दरांमध्ये सोमवारनंतर घसरण येण्याची शक्यता आहे़ नंदुरबार आणि शहादा तालुक्यात उन्हाळ्यात साधारण २२५ क्विंटल हेक्टरी कांदा उत्पादन होते़ यंदा तेवढेच उत्पादन आले आहे़दुसरीकडे पावसाळी कांदा उत्पादन हे कमी होत आहे़ यंदाच्या हंगामात हेक्टरी ७० क्विंटलपर्यंत कांदा उत्पादन येण्याची शक्यता आहे़ महिनाभराभरानंतर कांदा काढणी सुरू होईल़नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथे भेट देवून माहिती घेतली असता गावच्या ६०० हेक्टर क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रात कांदा लागवड होते़ यंदा प्रथमच पावसाळी कांदा लागवडीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले़ परंतु पाऊस झाल्यास कांदा खराब होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली़ आसाणे प्रमाणेच पूर्व भागातील इतरही गावांमध्ये शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे़ परंतू कांदा दर घसरण्यास प्रारंभ झाल्याने लागवड खर्च निघणे मुश्किल होईल़निर्यातबंदीचा फटका शेतकºयांना बसू लागला आहे़ बाजारपेठांमध्ये कांदा दर कमी होत आहेत़ उन्हाळी कांदा शेतकºयांकडे आहे़ परंतू हा कांदा सडण्याची प्रक्रिया होत असल्याने शेतकºयांना भुर्दंड बसत आहे़ पावसाळी उत्पादनही कमीच येईल़-युवराज विठ्ठल पाटील, माजी सभापती, कृउबास, नंदुरबार