शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

उत्साहींच्या आरडओरडीमुळे परीक्षार्थींना अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ४६ परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ४६ परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना मंगळवारी सकाळी सुरुवात झाली़ जिल्ह्यात सर्वत्र पहिला पेपर सुरळीत पार पडली असताना शिर्वे ता़ तळोदा येथील चार जणांवर कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आली़ तळोद्याचे प्रांताधिकारी अविशांत पांडा यांनी मंगळवारी शिर्वे येथे भेट दिल्यानंतर ही कारवाई करत केंद्रच बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे़जिल्ह्यात एकुण ४६ परीक्षा केंद्रांवर २२ हजार ७०० विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आली होती़ त्यापैकी २१ हजार ५०० विद्यार्थ्यांनी पहिल्या पेपरला हजेरी लावली़ मंगळवारी सकाळी परीक्षा सुरु होण्यापूर्वी नंदुरबार शहरातील सर्व परीक्षा केंद्रांवर मुले आणि मुली यांची कसून तपासणी करण्यात येत होती़ परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडणार अशी अपेक्षा होती़ परंतू पेपर सुरु झाल्यानंतर यशवंत हायस्कूल, डी़आऱ हायस्कूल, एकलव्य हायस्कूल या परिसरात कॉपी पुरणाºया उत्साहींनी उच्छाद मांडला होता़ पोलीसांकडून कारवाई करण्यात आल्यानंतर अनेकांनी पळ काढला़परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकाराविना परीक्षा सुरळीत वातावरणात पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाने सहा, जिल्हा परिषदेची १८ तर जिल्हाधिकारी यांनीही भरारी पथकांची निर्मिती केली होती़दरम्यान तळोदा तालुक्यातील शिर्वे येथे सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी भेट देत पाहणी केली असता, या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्याकडे दिला आहे़ मंगळवारी त्यांच्या भेटी दरम्यान परीक्षा केंद्र परिसरात कॉपी पुरवणाऱ्यांनी उच्छाद मांडला होता़ यातून त्यांनी नाराजी व्यक्त करत केंद्र संचालकांवर ताशेरे ओढत कारवाई केली़ सहाय्यक जिल्हाधिकारी पांडा यांनी शिर्वे परीक्षा केंद्रावर भेटीदरम्यान परिक्षावर कॉपी बहादरांचा सुळसुळाट दिसून आला़ तळोदा तालुक्यात तीन केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे़ शिर्वे केंद्र वगळता इतर दोन्ही ठिकाणी परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या़ ही दोन्ही परीक्षा केंद्रे तळोदा शहरात आहेत़ शिर्वे केंद्रावर पाहणी दरम्यान अविशांत पांडा यांना गोंधळ दिसून आला होता़ केंद्राबाहेर कॉपी देण्यासाठी अनेकांची झुंबड उडत होती़ तर वर्गांमध्येही विद्यार्थी कॉपी करत असल्याचे त्यांना दिसून आले होते़ हा गोंधळ पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद अशी २४ भरारी पथके आणि महसूल विभागाने तयार केलेल्या पथकांसह पोलीसांच्या पथकांनी आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये भेटी दिल्या़ या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांमध्ये अधिकाºयांची मांदियाळी असल्याचे दिसून येत होते़ वेळावेळी अधिकारी केंद्रामध्ये भेटी देत असल्याने शिक्षक आणि केंद्र प्रमुखांचीही धावपळ उडाली होती़ नंदुरबार शहरातील सर्व केंद्रांवर सकाळी सुरळीत परीक्षेला सुरुवात झाली़ परीक्षा केंद्रांच्या आतील भागात शांतता असताना बाहेरुन मात्र विनाकारण आरडओरड करुन त्रास देणाºयांची संख्या अधिक होती़ यातून मग पोलीस पथक आणि उत्साही यांच्यात बराच वेळ पळापळ झाल्याचे दिसून येत होते़ यातील काहींना पोलीसांनी ताब्यात घेतले होते़शिर्वे येथील गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी जिल्हाधिकारी यांना थेट पत्र देऊन शिर्वे येथील परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचे पत्र दिले आहे़ हे पत्र तातडीने जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाले असून त्यावर बुधवारी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे़