शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा झाल्याचा अभिमान- पालकमंत्री रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:49 IST

उपक्रम : सहभागी शाळा संस्थांचा झाला गौरव

नंदुरबार : तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा झाल्याची बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी गौरव समारंभात बोलतांना केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना, लायन्स क्लब, रोटरी क्लब नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जगात तिसरा तंबाखुमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून नोंद होणार आहे. त्यानिमित्त या उपक्रमात योगदान देणा:यांचा गौरव समारंभाचे मंगळवारी नाटय़गृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, शिक्षणाधिकारी आर.डी.कांबळे, डॉ.राहुल चौधरी, बी.आर.रोकडे, सलाम मुंबईचे अजय पिळणकर, रोटरीचे शब्बीर मेमन, नवनिर्माण संस्थेचे रवी गोसावी, हैदर नुराणी, डॉ.तेजल चौधरी आदी उपस्थित होते. पालकमंत्री रावल म्हणाले, मं.गांधी हे जगातील मोठमोठय़ा व्यक्तींचे प्रेरणास्थान असून त्यांच्या नावाने सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान निश्चितच यशस्वी होईल. स्वच्छता मोहिमेबरोबरच तंबाखूमुक्त मोहिम राबविण्यात आली असून आज जिल्हा तंबाखुमुक्त शाळांचा जगात तिसरा जिल्हा ठरला असल्यामुळे ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी सर्वाच्या परिश्रमामुळे जिल्हा तंबाखुमुक्त झाला. जिल्हाधिका:यांनी पुढाकार घेवून ही बाब शक्य करून दाखविल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जिल्ह्यात एक हजार 785 शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याचे नाव राज्यात निघत आहे. आता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्येही हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेत देखील आता सर्वानी सहभाग घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचलन रणजीत राजपूत, डॉ.माधव कदम, वसंत पाटील यांनी केले.