शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

‘सातपुडा’तर्फे उसाला 2,315 रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे यंदा उसाला शासनाच्या किमान आधारभूत भावापेक्षा दोन रूपये जास्त अर्थात 2,315 ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे यंदा उसाला शासनाच्या किमान आधारभूत भावापेक्षा दोन रूपये जास्त अर्थात 2,315 रुपये प्रती मेट्रीक टन भाव देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी        जाहीर केले. सातपुडा साखर कारखान्याच्या 45 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या उपस्थित झाला.भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी, कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, चेअरमन दीपक पाटील, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, माधव पाटील, हैदरअली नुरानी, दरबारसिंग पवार, चैतन्य अकोलकर, भाजपचे शहर अध्यक्ष अतुल जयस्वाल, डॉ.किशोर पाटील आदी उपस्थित होते. दीपक पाटील पुढे म्हणाले की, कारखाना सुरळीतपणे सुरू असून सभासदांनी कारखान्यास आपला सगळा ऊस पुरविण्याचे आवाहन केले. कारखान्याचे सर्व विभाग ऑटोमायङोशन झाल्याने तसेच सर्व व्यवहार पारदर्शक असल्याने कोणाचीही फसवणूक होणार नाही. परिसरातील शेतकरी मोठा झाला पाहिजे, जगला पाहिजे व त्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे या उद्देशाने स्व.पी.के. अण्णांनी तालुक्यात कारखानदारी उभी केली होती. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सातपुडय़ाची वाटचाल सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. कारखान्याच्या 27 हजार सभासदांपैकी केवळ सहा हजार सभासद कारखान्याला ऊस पुरवतात याकडे त्यांनी लक्ष वेधून हे दुर्दैवी असल्याचे सांगितले. सभासद जितका जास्त ऊस कारखान्यास पुरवतील तितकाच जास्त फायदा सभासदांना होणार असल्याने सर्व सभासदांनी सर्व ऊस कारखान्यास पुरविण्याचे आवाहन केले. गेल्यावर्षी कारखान्यातर्फे ऊसाला दोन हजार 151 रूपये भाव देण्यात आला होता. यंदा कारखाना शासनाच्या किमान आधारभूत किमतीपेक्षाही दोन रूपये जास्त म्हणजे दोन हजार 315 रुपये मेट्रीक टन एकरकमी भाव देणार असल्याचे दीपक पाटील यांनी जाहीर केले. आमदार राजेश पाडवी म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यातील शेतक:यांच्या झालेल्या नुकसानीबाबत लवकरच राज्यपालांची भेट घेऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रय} करणार असल्याचे सांगितले. विजय चौधरी म्हणाले की, स्व.पी.के. अण्णांनी काळ्या मातीशी इमान राखणा:या शेक:यांच्या कल्याणासाठी विविध संस्था उभ्या केल्याचे आणि या संस्था दीपक पाटील समर्थपणे सांभाळत असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात  कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील म्हणाले की, कारखान्यातर्फे शेतक:यांना त्यांच्या शेताच्या बांधार्पयत जाऊन मार्गदर्शन करण्यात येते. याचा शेतक:यांनी फायदा घ्यावा व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. यंदा कारखान्याकडे 14 हजार एकर उसाची नोंद झाल्याचे सांगून चार लाख टन ऊस गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, के.डी. पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, संपर्क अधिकारी प्रवीण पाटील, आनंदा पाटील, साखर कारखाना, सूतगिरणी, खरेदी- विक्री आदी संस्थेचे संचालक, नगरसेवक व शेतकरी सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  माजी मंत्री जयकुमार रावल या कार्यक्रमास उपस्थित रहाणार होते. मात्र काही कारणामुळे ते उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी ऑडिओ क्लिपद्वारे शुभेच्छा दिल्या.