शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

बर्डी आश्रमशाळा ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याच्या अध्यक्षांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बर्डी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बर्डी आश्रमशाळा बांधकाम ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या. दरम्यान, कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे अनेकवेळा बैठकीत व्यत्यय आला.जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झाली. उपाध्यक्ष राम रघुवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सभापती अभिजीत पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत आदींसह सदस्य सहभागी झाले होते. बैठकीत सदस्यांनी प्रश्न व समस्या उपस्थित केल्या. सी.के.पाडवी यांनी बर्डी, ता.अक्कलकुवा आश्रम शाळेत पाणी पुरवठ्याची कामे झाली नाही. काम न करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी केली. अध्यक्षा वळवी यांनी ठेकेदाराने काम केलेले नाही. त्यामुळे त्याचा निधीही परत गेला आहे. ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे अशा सुचना त्यांनी दिल्या.देवमन पवार यांनी आष्टे आरोग्य केंद्रातील कुपनलिका सुरू करावी अशी मागणी केली. तसेच या गटातील अंगणवाडी सुपरवायझर यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यामुळे बालआरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी या भागात रिक्त पदे आहेत. नवीन पदे भरली जाणार आहेत. सुपरवायझरच्या फिरस्तिीचे टाईम टेबल ठरवून दिले जाईल असे सांगितले.मधुकर नाईक यांनी आमलान नळ पाणी पुरवठा योजना पुर्ण होऊनही सरपंचांना बिलांसाठी फिरवले जात असल्याचे सांगितले. तसेच सदस्य खाते प्रमुखांना भेटावयास गेले तर अधिकारी मोबाईलवर ठेकेदाराशी बोलण्यात दंग असतात. सदस्यांना ताटकळत ठेवले जात असल्याची तक्रार केली. त्यावर अध्यक्षांनी अधिकाऱ्यांचे असे वागणे बरे नव्हे, असे सांगत प्रोटोकॉलनुसार वेळ द्यावा असे सांगितले.जिल्हा परिषदेत दुपारच्या वेळी अर्थात एक ते तीन वाजेदरम्यान कर्मचारी जागेवर राहत नसल्याची तक्रार धनराज पाटील यांनी केली. दुर्गम भागातून काम घेऊन आलेला व्यक्ती तीन वाजेपर्यंत ताटकळतो. सायंकाळी वाहन भेटणार नाही म्हणून अधिकारी, कर्मचाºयाची वाट पाहून काम न होताच परततो. त्यामुळे दुपारी कर्मचाºयांना जागेवर उपस्थित राहण्याच्या सुचना द्याव्या अशी मागणी केली. उपमुख्य अधिकारी बेडसे यांनी दुपारी एक ते दोन वाजेदरम्यान अर्धा तासाची जेवनाची सुट्टी असते. त्या व्यतिरिक्त कर्मचारी कुठे जाऊ शकत नाही. तरीही सर्व विभागांना लेखी सुचना देऊन दुपारच्या वेळी सर्व कर्मचारी उपस्थित राहतील याबाबत लक्ष देणार असल्याचे सांगितले. अर्चना गावीत यांनी लेखी तक्रारी देऊन चौकशीची मागणी केली.जिल्हा परिषद पदाधिकारी व कर्मचारी निवासस्थान परिसरातील गवत व काटेरी झुडपे काढण्याची कार्यवाही करावी अशी मागणी देवमन पवार यांनी केली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी आॅनलाईन सहभागी झाले होते.