लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : नंदुरबार व नवापूर तालुक्याच्या सीमेवरील सुरपाळ व अजिपाळ येथे दिवाळीत साज:या होणा:या यात्रोत्सवात आमसरपाडा, खोलघर, हनुमंतपाडा, वांझळे, अजेपूर, केवडीपाडा, विटावे, वाल्हवे, नावली, मोग्राणी, खोलविहीर, सुतारे, अंबापूर, घोगळपाडा, वाघाळे, तलावपाडा, अशा परिसरातील अनेक गावांचे भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.आदिवासींच्या परंपरेनुसार यंदाही दिवाळीत देवाची पूजा करून संपूर्ण जीवजंतू, पशु पक्षी, शेतशिवार, पोराबाळांचे शिक्षण, आरोग्य यामध्ये कल्याण व्हावे, सुखी ठेवावे यासाठी देवाजवळ प्रार्थना केली.यात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी आमसरपाडा, हनुमंतापाडा, खोलघर, वांघळे येथील गावपंचांनी ठरविल्यानुसार लोकसहभागातून निधी गोळा करीत मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आहे. भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरपंच अर्चना कोकणी, माजी सरपंच तुळशिराम जगताप, ग्रामपंचायत सदस्य, आमसरपाडाचे पोलीस पाटील, लालसिंग चौधरी, श्रावण जगताप, श्रीकांत चौरे, पोलीस पाटील, खोलघर, धर्मा चौरे, धरमदास चौरे, राजू कामडे, ज्योतीसिंग पवार, प्यारेलाल कोकणी, चिंतामण गवळी, पंडित चौरे यांनी रस्ते, पाण्याची सोय, मंडप, परिसर स्वच्छता, स्वयंसेवक, वाहनपार्क्ीग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मंडप विनामूल्य उपलब्ध करणारे राजू ब्रिजलाल चौरे, पार्क्ीसाठी शेत उपलब्ध करणारे चुणिलाल ठाकरे, वाहन शिस्तीत लावणारे हिरा भोये, रमण गवळी, मनु गवळी, मगन चौरे, रामचन चौरे, श्रीकांत चौरे या सर्व विनामूल्य सेवा देणा:यांचे समितीने देवस्थानच्या वतीने आभार मानले. यापुढे चांगल्या सोयी-सुविधा देण्याचा मानस आहे.
सुरपाळ-अजिपाळच्या यात्रोत्सवाला परिसरातील भाविकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:33 IST