शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गुजर समाज सामूहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी : 18 फेब्रुवारीला निझर येथे सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समस्त लेवा पाटीदार गुजर समाज व गुजर समाज मंचतर्फे निझर (गुजरात) येथे होणा:या सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यासाठी तब्बल सात एकर जागेत दीड लाख स्क्वेअर फुटचा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. सुमारे 15 हजार लोकांची भोजन व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. येत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समस्त लेवा पाटीदार गुजर समाज व गुजर समाज मंचतर्फे निझर (गुजरात) येथे होणा:या सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यासाठी तब्बल सात एकर जागेत दीड लाख स्क्वेअर फुटचा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. सुमारे 15 हजार लोकांची भोजन व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली आहे. येत्या 18 फेब्रुवारीला नियोजित मुहूर्तावर हा लगAसोहळा पार पडेल.गुजर समाज मंचतर्फे निझर येथे सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यासाठी निझर येथील कार्यकर्ते तथा गुजर मंचचे सदस्य या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत. विशेषत: गुजर समाजात सामूहिक विवाह सोहळ्याची प्रथा नव्हती. गेल्यावर्षी विविध शहर ग्राम गुजर मंडळाने प्रकाशा येथे पहिला सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यातील प्रतिसाद पाहता या वर्षापासून दोन टप्प्यात सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. पहिल्या टप्प्यात गुजर समाज मंच व निझर येथील समाज बांधवांनी 18 फेब्रुवारीला हा सोहळा घेतला आहे. त्यासाठी तब्बल 23 जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. विनामूल्य हा विवाह सोहळा होणार आहे. विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांसाठी प्रत्येकाला स्वतंत्र विधीसाठी ब्राrाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समाज प्रथेप्रमाणे सर्व विधी संयोजकांनी करून देण्याची सुविधा केली आहे. विशेषत: या विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांसाठी दात्यांतर्फे वधू-वरांसाठी पोशाख, ब्युटीपार्लरची सुविधा, फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग यासह अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोहळ्याला सुमारे 15 हजार समाज बांधव उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यादृष्टीने भोजनाची व इतर व्यवस्था आयोजकांनी केली आहे. त्यासाठी निझर येथील आर.जी. पाटील विद्यालयालगतच्या सात एकर जागेत मंडप उभारणी सुरू आहे. एकूण दीड लाख स्क्वेअर फुटचा मंडप उभारण्यात येत असून त्यात भोजन व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे.