शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी स्मार्ट कार्ड वितरण ठप्प : नंदुरबार आरटीओ कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रादेशिक परिवहन विभागातर्फे 1 जानेवारीपासून देण्यात येणारे स्मार्ट कार्ड नंदुरबारात अद्याप एकाही व्यक्तीला असे कार्ड वितरीत केले नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या कार्डसाठी अनेक वाहनचालकांनी आपली सर्व कागदपत्रे जमा केलेली आहेत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, संबधीत ठेकेदार आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रादेशिक परिवहन विभागातर्फे 1 जानेवारीपासून देण्यात येणारे स्मार्ट कार्ड नंदुरबारात अद्याप एकाही व्यक्तीला असे कार्ड वितरीत केले नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या कार्डसाठी अनेक वाहनचालकांनी आपली सर्व कागदपत्रे जमा केलेली आहेत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, संबधीत ठेकेदार आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यात समन्वय नसल्यामुळे ही वेळ आली आहे.परिवहन विभागातर्फे विविध उपक्रम राज्यस्तरावर राबविले जात आहेत. परंतु नंदुरबार कार्यालयातर्फे याबाबतची अंमलबजावणी फारशी होत नसल्याची स्थिती आहे. आता नव्याने स्मार्ट कार्ड वितरणाच्या संदर्भात देखील तीच बोंब सुरू असून दहा दिवसात एकही स्मार्ट कार्ड वितरीत केले गेले नसल्याची स्थिती आहे.काय आहे स्मार्ट कार्डवाहनधारकांना आतार्पयत वाहनांची वेगवेगळी कागदपत्रे सांभाळावी लागत होती. त्यासाठी एक फाईलच घेवून फिरावी लागत होती. राज्य किंवा राष्ट्रीय परमीट असलेल्या वाहनाधारकांना तर अशी फाईल बाळगतांना किंवा घेवून फिरतांना मोठी कसरत करावी लागते. फाईल हरवली तर किंवा गहाळ झाली तर दुसरे कागदपत्रे मिळविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर फिरफिर करावी लागत होती. आता हे सर्व थांबणार आहे. एटीएम कार्डसारखे नवीन स्मार्टकार्ड राहणार आहे. त्यात असलेल्या एका चिपमध्ये वाहन मालकाचा संपुर्ण डाटा राहणार आहे. वाहनांची माहिती, चेसीस नंबर, पासींग नंबर यासह इतर आवश्यक माहिती या चिपमध्ये साठवली जाणार आहे. स्मार्ट कार्डमधील चिपसह संबधीत कार्यालयात देखील हा डाटा संकलीत राहणार आहे. स्मार्ट कार्डवर नाव आणि नंबर राहणार आहे. तो नंबर  सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.हे कार्ड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या किंवा जेथे तपासणीसाठी उपकरण असेल तेथे स्वाईप केल्यावर संबधीत उपकरणाच्या स्क्रिनवर सर्व माहिती दिसू शकणार आहे.विजेची समस्यास्मार्ट कार्ड वितरीत करण्याचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आले आहे त्या कंपनीने अद्याप वीज पुरवठा घेतला नसल्यामुळे नंदुरबारात स्मार्ट कार्ड वितरीत होत नसल्याची समस्या आहे. संपुर्ण राज्यात संबधीत कंपनीला ठेका दिला गेला आहे. त्यांनी स्वत: वीज पुरवठा घेवून हे काम करावयाचे आहे. नंदुरबारात सर्व मशिनरी आणि इतर साहित्य दाखल आहे. केवळ वीज पुरवठा मिळाला तर लागलीच कामाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांनी राज्य कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अनेकांना अडचणीचे 1 जानेवारीपासून नवीन स्मार्ट कार्डचे वितरण करणे आवश्यक आहे. नवीन वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, विक्री किंवा इतर बाबीसाठी अनेकांनी आपली कागदपत्रे उपप्रादेशिक कार्यालयात जमा करून ठेवले आहेत. त्यांना कागदपत्रेही मिळत नाहीत आणि स्मार्ट कार्डही मिळत नसल्यामुळे अनेकांचे व्यवहार अडकले आहेत. ज्यांना राष्ट्रीय परमीट आहे त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. दहा दिवसापासून अनेकजण या कार्यालयाच्या चकरा मारून परत फिरून जात आहेत.  यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तातडीने ही समस्या मार्गी लावावी व स्मार्टकार्ड वितरण यंत्रणा कार्यान्वीत करण्याची मागणी आहे.