शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

खरीप हंगामाच्या तोंडावर पोस्ट कार्यालय व बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

बँक व्यवहार बंदचा शेतीला फटका या मथळ्या खाली १५ मे २०२१ रोजी ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल ...

बँक व्यवहार बंदचा शेतीला फटका या मथळ्या खाली १५ मे २०२१ रोजी ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत बँका पूर्णवेळ सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.

सर्व बँका व पोस्ट ऑफिस हे नियमित वेळेत व १०० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमण्यात यावा. शाखेमध्ये एका वेळेस फक्त पाच ग्राहकांना प्रवेश दिला जाईल. बँक आणि पोस्ट कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच ग्राहक यांनी कोविड विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक राहील. यामध्ये ग्राहकांनी शारीरिक अंतर ठेवणे, चेहऱ्यावर मास्क लावणे, हात सॅनिटाइज करणे आदी बाबींचा समावेश आहे.

ग्राहकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बँकेच्या शाखेमध्ये यावे. सर्दी, ताप, खोकला, इत्यादीचा त्रास असलेल्या ग्राहकांनी बँकेत येणे टाळावे. याबाबत बँकेत दर्शनी भागावर सूचना फलक लावावा. ग्राहकांनी बँकेच्या काऊंटरपासून तीन ते पाच फुटांचे अंतर ठेवावे. पोस्ट व बँकामध्ये एका काऊंटरवर एका वेळी एकच ग्राहक हजर राहील याची दक्षता घ्यावी, उर्वरित ग्राहकांना पोस्ट ऑफिस व बँकच्या बाहेर दोन ते तीन फुटांचे अंतरावर थांबण्याची व्यवस्था करावी.

पोस्ट ऑफिस व बँकेच्या एटीएममध्ये एका वेळी एकच ग्राहक प्रवेश करेल व उर्वरित ग्राहकांना दोन ते तीन फूट अंतरावर थांबण्यास सांगावे. एटीएम मशीनचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सर्व बँकांनी आपापल्या शाखेतील एटीएम, कॅश, चेक डिपॉजिट मशीन, पासबुक प्रिंटर्स व शाखेतील उपकरणे यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. बँक इमारत व परिसरामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय, एटीएम कॅश डिपॉजिट मशीन या बँकेच्या इतर सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत प्रेरित करावे.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितामधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.