शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

मान्सूनपूर्व पावसाची नंदुरबारात दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:39 IST

156 मि.मी.पावसाची नोंद : सर्वाधिक धडगाव तालुक्यात, आंबा पिकाचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/शहादा/तळोदा/प्रतापपूर : जिल्हाभरात रविवारी पहाटे मान्सूनपूर्व पाऊस झाला. अवघ्या दोन ते तीन तासात जिल्ह्यात 156 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक 69 मि.मी.पाऊस अक्कलकुवा तालुक्यात नोंदला गेला. दरम्यान, रविवारी देखील दुपार्पयत ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानाचा पारा घसरून 36 अंशावर आला होता. यामुळे नागरिकांना हायसे वाटले.शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडय़ाने नागरिक हैराण झाले होते. दुपारचे तापमान देखील नेहमीप्रमाणे 40 अंश नोंदले गेले होते. परंतु सायंकाळी सोसाटय़ाचा वारा आणि ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता निर्माण झाली. परंतु रात्री उशीरार्पयत पाऊस            आला नाही. शहादा, अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार भागात रात्री  साडेबारा वाजेनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सोसाटय़ाचा वारा आणि पाऊस            सुरू झाला. पावसाचा जोर अक्कलकुवा, तळोदा, धडगाव तालुक्यात सर्वाधिक होता. या भागात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागासह तालुक्यातील बहुतांश भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली. नंदुरबारचे रविवारचे तापमान 36 अंश नोंदले गेले. 24 तासाताच पारा घसरल्याने गेल्या महिनाभरापासून तापमान आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.शहादाशहादा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला आहे.  गेल्या तीन महिन्यापासून कडकडीत उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. यंदा 43 ते 45 र्पयत तापमान गेल्याने सर्वच जण हैराण झाले होते. शनिवारी रात्री          साडेअकरा वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल तीन तास चाललेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.  शहरातील प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे तलावसदृश्य डबके साचले होते. शासकीय विश्रामगृह, भाजी मार्केट परिसर, सप्तशृंगी मंदिराजवळील पाटदेखील ओसंडून वाहत होता.      बसस्थानक आवारातही मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. प्रवाशांना पाण्याच्या डबक्यातून मार्ग काढत बस पकडावी लागत होती. बसस्थानक आवारात लावलेला जाहिरातीचा फलक कोसळला. दरम्यान, सातपुडय़ात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्गम भागातील आदिवासी शेतक:यांनी रविवारी सकाळीच बियाणे खरेदीसाठी शहरात हजेरी लावल्याने दुकानांवर गर्दी दिसून आली.तळोद्यात वीजपुरवठा खंडिततळोदा येथेही शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नागरिकांनी झोपेतून उठून पावसाचे स्वागत केले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. शहरातील विविध भागात पाणी साचले होते. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे आधीच उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या            समस्येत भर पडली. सकाळर्पयत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाले. प्रतापपूर परिसरप्रतापपूरसह परिसरात शनिवारी रात्री 12 वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतक:यांच्या शेतातील चारा व केळीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मात्र उकाडय़ाने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून, कापूस लागवडीसह केळी, ऊस आदी पिकांना पाणी मिळाल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रविवारी पहाटे पाच वाजेर्पयत चाललेल्या पावसामुळे शेतात पडून असलेला भुईमूगाचा पाला व मक्याचा कडब्याचे नुकसान झाले आहे. या वेळी पावसाबरोबरच जोरदार वारा वाहू लागल्याने शेतात उभ्या असलेल्या केळी पिकाचे नुकसान झाले. शनिवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा  रविवारी सायंकाळी सहा वाजता सुरळीत झाला. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला.या पावसामुळे लागवड करण्यात आलेल्या संकरीत कापूस, ऊस व केळी पिकास पाणी मिळाल्याने शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.