शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

म्हसावद ते सुलतानपूर रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

हा रस्ता मध्यप्रदेश राज्याकडे जाण्यासाठी एकमेव असल्याने परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा ठरत आहे. या रस्त्याचे रूंदीकरण होणार असले तरी एक ...

हा रस्ता मध्यप्रदेश राज्याकडे जाण्यासाठी एकमेव असल्याने परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा ठरत आहे. या रस्त्याचे रूंदीकरण होणार असले तरी एक ते दीड वर्षापासून घोडे अडले कोठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य डाॅ. किशोर पाटील यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत खासदार डाॅ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे अनेकवेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. रस्ता चार किलोमीटरचा असला तरी पार करण्यासाठी अर्ध्या तासाचा कालावधी लागतो, इतकी दुर्दशा या मार्गाची झाली आहे.

रस्त्यात मोठमोठे खड्डे झाल्याने ऊस, केळी व पपईची वाहने नेताना वाहन चालकाला जीव धोक्यात टाकून जावे लागते. दर १५ दिवसात एक वाहन पलटी होत असून, वाहन मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. डांबरीकरण नावालाच उरले असून, खडी उखडून गेली आहे. रस्त्यावरील भराव अनेक ठिकाणी खचल्याने उंचवटे तयार झाले आहेत. चारही फरशींवरील भराव खचला असून, वळणावरील रस्त्यांच्या बाजूची झाडे वाढली आहेत. परिणामी समोरून येणारे वाहन दिसत नाही. हा रस्ता टवळाई, गणोर, अंबापूर, आडगाव व म्हसावद परिसरातील गावाना सोयीचा असून, वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याची दुरूस्ती, रूंदीकरण त्वरित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य डाॅ. किशोर पाटील यांच्यासह सुलवाडा, सुलतानपूरचे सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी केली असून, दुरूस्ती न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.