या अंगणवाडीच्या दुरवस्थेसंदर्भात वेळोवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व धडगाव गटविकास अधिकारींसह तालुुका बालविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र, त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुंडल, ता.धडगाव येथील अंगणवाडीच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, ती पडक्या स्थितीत आहे. या पडक्या इमारतीतच अंगणवाडी भरविली जात असल्याने, विद्यार्थ्यांच्या जीवानिशी खेळण्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे या पडक्या इमारतीचे लवकरात लवकर नव्याने बांधकाम करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली, तसेच भविष्यात या इमारतीमुळे अप्रिय घटना घडल्यास त्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला.
या निवेदनावर बिलाड्या पाडवी, रतिलाल पाडवी, दिवाल्या पाडवी, जहागिरी पाडवी, मोल्या वळवी, सुनील वळवी, कागडा पाडवी, रेवा पाडवी, लाखा पाडवी, पांगल्या पाडवी, बोंडा पाडवी, होमना पाडवी, दिरबा पाडवी, गुंदारी पाडवी, लक्ष्मण पाडवी आदी ग्रामस्थाच्या सह्या आहेत.