लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळोद्यातील ज्या गणेश मंडळांकडून यावर्षी सामाजिक भान ठेवून व शासन नियमांचे पालन केले जाईल अशा गणेश मंडळांचा पोलीस प्रशासन प्रमाणपत्र देऊन गौरव करेल अशी माहिती अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली़ तळोदा येथे शांतता कमिटीच्या बैठकीत त्यांनी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांसोबत चर्चा करत ही माहिती दिली़बैठकीला प्रांताधिकारी अविशांत पांडा, नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, तळोदा तहसीलदार पंकज लोखंडे, नगरसेवक गौरव वाणी, मुख्याधिकारी सपना वसावा, विद्युत वीज वितरण उपकार्यकारी अभियंता सचिन काळे, वंदना तोरवणे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक गवळी यांनी आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोरोना महामारीमुळे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणेच घरीच उत्सव साजरा करावयाचा आहे. कोणत्याही मंडळाला मिरवणूक काढण्याची परवानगी नसेल गणपती विसर्जना दरम्यान फक्त दोन लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. दरवर्षी अनेक सार्वजनिक गणेश मंडळ हे सजावटीसाठी खर्च करत असतात परंतु यावर्षी कोणतेही स्वरुपाचे डेकोरेशन न करता आपण विधायक उप्रकम राबवत प्रशासनाला करावी आणि गणपती विसर्जन करण्यासाठी तळोदा नगरपालिकेने कृत्रिम तलाव तयार करावा असे सांगितले़ निसार मक्राणी, माजी उपनगराध्यक्ष अनुपकुमार उदासी, भाजपचे जगदीश परदेशी, जेष्ठ नागरिक रसिकलाल वाणी यांच्यासह तळोदा शहरातील अनेक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी मानले.बैठकीत गौरव वाणी यांच्याकडून शहरातील ज्या मंडळांकडून सोशल डिस्टन्सिंग व शासन नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा केला जाईल अशा मंडळांना पाच हजार रूपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आल़ यातून मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे़
गणेश मंडळांचा पोलीस करणार गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:47 IST