शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दादाच सांगे आम्ही अॅड होणार ही ‘अफवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:15 IST

सायबर सेल : अफवा रोखण्यासाठी जनजागृतीवर पोलीस दलाचा भर

नंदुरबार : अनोळखींना मारहाण झाल्याच्या घटनांनंतर राईनपाडा ता़ साक्री येथे पाच भिक्षुकांची हत्या झाली होती़ वाढत्या अफवा रोखण्यासाठी पोलीसांनी जनजागृती सुरू केली होती़ याच दरम्यान ‘व्हॉटस अॅप’ ग्रुपवर पोलीस दादा अॅड होणार अशा पोस्ट सुरू झाल्या होत्या़ परंतू अशा प्रकारचा कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे सायबर सेलकडून सांगण्यात आले आह़े यामुळे ही पोस्ट अफवा ठरली आह़े  पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन अर्थात व्यक्ती ते व्यक्ती संवाद साधण्याचे माध्यम म्हणून व्हॉटस अॅप या सोशल मिडियाचा वापर करण्यात येतो़ गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणा:या टोळीच्या अफवा पसरल्याने अनोळखी व्यक्ती आणि भिक्षुकांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या होत्या़ या घटनांना अटकाव व्हावा म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीवर भर देण्यात आला होता़ बहुतांशी यशस्वी झालेल्या या मोहिमेत काही दिवसांपूर्वी पोलीसही त्या-त्या व्हॉटस अॅप ग्रुपला अॅड होणार असा मेसेज फिरवण्यात येत होता़ ब:यापैकी व्हायरल झालेल्या या मेसेजमुळे एकच चर्चा सुरू झाली होती़ सुरू असलेली ही चर्चा आता सायबर सेलकडूनच थांबवण्यात आली असून ‘आम्ही अॅड होणार’ ही सुद्धा अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आह़े जिल्ह्यात शेकडोंच्या संख्येने व्हॉटसअॅप ग्रुप्स असून किमान 4 लाखांच्या जवळपास युजर्स त्यात समाविष्ट आहेत़ या सर्व युजर्स अर्थात मोबाईल ग्राहकांकडून सातत्याने फिरवल्या जाणा:या पोस्टवर नजर ठेवून त्यांची तपासणी करण्यासाठी लागणारी  योग्य साधने आणि एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील डाटा कव्हर करण्यासाठी तेवढय़ाच क्षमतेचे सव्र्हर उपलब्ध नाहीत़ सायबर सेलकडून केवळ एखादी वादग्रस्त पोस्ट प्रकाशित झाल्यानंतर तिची चाचपणी करत तिचे संकलन केले जात़े एकीकडे व्हॉटस ग्रुप्सबाबत पोलीस अॅड होणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी दुसरीकडे फेसबुक, ईन्स्टाग्राम आणि इतर ओपन समाजमाध्यमांवर मात्र पोलीसांची करडी नजर राहणार आह़े समाजात तेढ निर्माण करणा:या, भावना भडकावणा:या, अफवा फैलावणा:या पोस्ट वेळावेळी पाहून त्यांची तपासणी होणार आह़े सायबर सेलकडून केल्या जाणा:या या कामकाजामुळे समाजकंटकांवर वचक निर्माण होणार आह़े यामुळे कायदा आणि सुव्यवस्थाही अबाधित ठेवण्यास मदत होणार आह़े  अफवा रोखण्यासाठी पोलीस दलाकडून अद्यापही जनजागृती सुरू असून पोलीस ठाण्यांद्वारे नागरिकांना माहिती दिली जात आह़े अनेक ठिकाणी जनजागृतीपर फलक लावून माहिती दिली जात आह़े