नंदुरबार : एका चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या आरोपीने स्वत:चे नाव न सांगता दुस:याच एकाचे नाव सांगितल़े धक्कादायक म्हणजे तपासी पोलिसदेखील संबंधित आरोपीच्या जाळ्यात अडकत ‘मामू’ बनल्याने सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी दुपारच्या सुमारास गुजरात येथील व्यापारी नरेश पुरुषोत्तम वोढ हे आपले धुळे येथील व्यापारी काम आटोपून नंदुरबार मार्गे गावी जात असताना अवलगाजी दर्गा परिसरात त्यांना चोरटय़ांनी लुटल़े त्यांच्या जवळील 1 लाख 10 हजार रुपये हिसकावत घेत आरोपींनी पळ काढला होता़ याबाबत वोढ यांनी घटनेची माहिती नंदुरबार शहर पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाची चक्रे फिरवण्यात आली़ दरम्यान, काही तासांमध्ये शुक्रवारी घटनेबाबत चार आरोपींना गुन्हा शाखेकडून अटकही करण्यात आली़ आरोपीतांपैकी, एक शेख हमीद शेख रज्जाक (33) रा़ गाजी नगर नंदुरबार यांने स्वत:ला वाचवण्यासाठी पोलिसांच्या चौकशीत आपले नाव राहुल रमण साळवे (31) रा़ दत्ता कॉलनी नंदुरबार असे असल्याचे खोटे सांगितल़े व पोलिसांनीदेखील वस्तुस्थिती लक्षात न घेता तसेच कुठलीही शहानिशा न करता आरोपीने सांगितलेल्या नावावर गुन्हा दाखल केला़ परंतु नंतर प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, आरोपीचे नाव राहुल रमण साळवे नसून तो शेख हमीद शेख रज्जाक असे असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनाही आपली चूक समजली़
अटकेतील आरोपीने पोलिस अधिका:यांना बनवले ‘मामू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:16 IST