शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

शहाद्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांना मिळाले घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : येथील दोंडाईचा रोडवरील मोहिदा शिवारातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : येथील दोंडाईचा रोडवरील मोहिदा शिवारातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. धाडीत तब्बल १३ लाख एक हजार रुपये रोख तसेच १४ चार चाकी वाहने, आठ मोटार सायकली, ४५ मोबाईल असा एकुण सुमारे ७८ लाख १६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ४३ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहाद्यात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार आहे. नुकतेच येऊन गेलेले नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कारवाईचेही बजावले होते. त्यानुसार पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाया केल्या, परंतु एवढी मोठी कारवाई आतापर्यंत कुठेच झाली नव्हती. शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहने देखील आतापर्यंत जप्त झालेली नव्हती.सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सुनिल साळुखे , उपनिरिक्षक विक्रांत कचरे , कैलास माळी , उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी भगवान सावळे , गणेश सावळे , रविंद्र सपकाळे , योगेश खेळकर , निखील ठाकरे , मकसुद पठाण , किरण भील , दिपक मालचे , महेंद्र शिंदे , चालक साळवे , चालक सचिन पॉल, चालक मराठे, अमरसिंग वळवी यांच्या पथकाने केली.तपास परिविक्षाधिन पोलीस उप अधिक्षक, सुनिल साळुखे व सहायक पोलीस निरिक्षक भगवान कोळी करत आहेत.

कारवाईत नंदुरबार, तळोदा, साक्री, शिंदखेडा, दोंडाईचा व शहादा येथील नागरिकांसह मध्यप्रदेशातील व्यावसायिकांचा समावेश असल्याने व सर्वाधिक आरोपी हे मध्यप्रदेशातील असल्याने या अड्ड्याची ख्याती किती होती याबाबत अंदाज येतो. विशेष म्हणजे पोलिसांनी धाड टाकल्यानंतर येथे सुमारे ७० ते ८० लाख रुपये रोख रक्कम जप्त केल्याची चर्चा संपूर्ण शहरात होती. पोलिसांनी तीन गोण्यांमध्ये सदर पैसे भरुन पोलीस ठाण्यात आणले तेथे या सर्व पैशाची मोजणी करण्यात आली पैसे मोजण्यासाठी मशिन ही मागविण्यात आले होते. मोजणीनंतर ती रक्कम १३ लाख एक हजार रुपये भरली.

शहादा पोलिसांना माहिती नाही?मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता या अड्ड्यावर धाड टाकली.रकमेची मोजणी करण्यासाठी व आरोपींना अटक करून शहादा पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी सुमारे बारा तास सलग पोलीस कारवाई सुरु होती. या बारा तासात धाड टाकणारे सर्व अधिकारी व कर्मचारी बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पैशांची मोजणी करून गुन्हा नोंदणी करण्याचे काम करत होते. या ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व पथकाला मिळाली मात्र ज्या शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर परिसर येतो त्या पोलिस ठाण्याला या याबाबत तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने टाकलेल्या धाडी बाबत कुठलीच माहिती नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.