कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असताना, या कालावधीत गरजूंना दोन वेळचे भोजन मिळावे, यासाठी शिवभोजन थाळीचा इष्टांक दीडपट वाढविण्यात आला. गरीब आणि गरजूंना दिलासा देण्यासाठी १५ मेपर्यंत ही थाळी मोफत वितरित करण्यात येत आहे.
गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत अक्कलकुवा तालुक्यात पाच हजार ९९०, अक्राणी पाच हजार ९५, नंदुरबार १३ हजार सहा, नवापूर पाच हजार ६३०, शहादा पाच हजार ९९१ आणि तळोदा तालुक्यात पाच हजार ८७७ अशा एकूण ६२ हजार ८१५ थाळ्यांचे वितरण थाळ्यांचे वितरण करण्यात आले.
सकाळी ११ ते दुपारी चार या कालावधीत इष्टांकानुसार या थाळ्यांचे वितरण होत आहे. लॉकडाऊन काळात पार्सलची सुविधाही देण्यात येत आहे. कोरोनाने रोजगाराचे प्रश्न निर्माण केले असताना, या थाळीमुळे माणसाची भूक भागविण्याचे काम होत आहे.