सद्गुरू हरदेवसिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने शहरातील सिंधी कॉलनीतील संत निरंकारी सत्संग भवन परिसरात वृक्षारोेपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेेे. या कार्यक्रमात शंकरलाल हासाणी व सुनीता संतोष चव्हाण यांच्या हस्ते संत निरंकारी सत्संग भवनाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धनाचा संकल्प उपस्थित भक्तांनी केला. तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसरात साफसफाई करण्यात आली. या उपक्रमातून ‘प्रदूषण अंदर हो या, बाहर दोन्होही हानीकारक है’ हा संदेश निरंकारी बाबाजींनी दिला आहे. तसेच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासह स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. संत निरंकारी मंडळ नंदुरबार शाखेचे पी.डी. निकुंभे व सेवादल प्रमुख सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोेजन केले होते. याप्रसंगी एस.के. धनगर, कुणाल कानडे, नरेंद्र तांबोळी, महेश नवले, लखन भगत्यापुरी, सुनील आहुजा यांच्यासह सेवादलाचे पुरुष व महिला सदस्य उपस्थित होते.
संत निरंकारी मंडळातर्फे नंदुरबार येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST