पर्यावरणाचे संरक्षणे व्हावे, जैवविविधता टिकून राहावी, गावाच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी तिलेनी चौक, बुद्धविहार, मंदिर, मस्जिद व उट्या नाल्याच्या परिसरात गटनेते मनीष गरुड, के. डी. नाईक, माजी सरपंच प्रियदर्शन कदमबांडे, वसंत चौधरी, जयसिंह गरुड, राजू भिल, परशुराम रामोळे, गोरख शेळके, डॉ. राकेश वाडिले, डॉ. नितीन ततार, पत्रकार बाबूभाई मण्यार, प्रभाकर घोडेराज यांच्या हस्ते सुमारे २०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी वृक्षप्रेमी युवा मंचचे गोरख शेळके, आनंदा भोई, नामदेव धनगर, सचिन धनगर, विलास सोनवणे, गणेश चव्हाण, प्रवीण मोरे, अनिल बोरसे, आकाश मोरे यांचे सहकार्य लाभले. या वृक्षांना तारेची जाळी प्रकाश धनगर, डॉ. राकेश वाडिले, डॉ. नितीन ततार, पत्रकार बाबूभाई मण्यार, मनीष गरुड, प्रकाश धनगर, भूषण पाटील, किशोर घोरपडे यांच्यातर्फे देण्यात आल्या.
तोरखेडा येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST