तळोदा : व्यापा:याचा गाडीच्या पुढे मोटारसायकली उभ्या करून शस्त्र दाखवत व्यापा:याकडून चार लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा सहा लाखांचा मुद्देमाल रस्ता लुटारूंनी चोरून नेला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आमलाड नजीक अंकलेश्वर-ब:हाणपूर मार्गावर ही घटना घडली. नंदुरबार येथील साखरेचे व्यापारी उमेद रूपाचंद जैन, विरलकुमार महावीर जैन, किशोर घेवरचंद ताथेड व पप्पू घेवरचंद जैन हे चार व्यापारी नेहमीप्रमाणे अक्कलकुवा, तळोदा व प्रकाशा येथे विकलेल्या किरणा मालाची वसुलीसाठी किरणा प्रतिष्ठानांवर येतात. शुक्रवारी दुपारीदेखील ते नंदुरबारहून आले होते. तळोद्यातील व्यापा:यांकडून चार लाख रूपयांची वसुली या व्यापा:यांनी केल्यानंतर ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तळोद्याहून निघाले होते. आमलाडच्या पुढे चार दुचाकीस्वारांनी त्यांची गाडी थांबविली. त्यानंतर दबा धरून बसलेले 10 त 12 जण गाडीजवळ आलेत. त्यातील काहींजवळ धा:या, कोयता, तलावरील अशी धारधार शस्त्रे होती. काहींनी ही धारधार शस्त्रांचा धाक व्यापा:यांना दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग एकाने हिसकावून घेतली. काहींनी मिरचीची पूडदेखील व्यापा:यांच्या डोळ्यात फेकली. गाडीचालकावर तलवारीचा वार केला. पोलीस घटनास्थळी पोहचेर्पयत लुटारू तेथून पसार झाले होते. रात्री उशिरा र्पयत तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. व्यापा:यांना लुटण्याची घटना शहरातील व्यापा:यांच्या कर्णोपकर्णी गेल्यानंतर व्यापा:यांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. कारण महिनाभरात रस्ता लुटीच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. व्यापा:यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.एका व्यापा:याच्या गळ्यातील चैन, हातातील ब्रासलेटदेखील हिसाकावून घेतले. रोकड पाच लाख व सोन्याचे वस्तू मिळून साधारण सहा लाखांचा ऐवज या लुटारूंनी लूटून नेल्याचे या व्यापा:यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या लुटारूंनी गाडीवरही दगड फेक केल्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या आहेत.
तळोद्यानजीक रस्त्यावर व्यापा:यांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:47 IST