शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलच्या भडक्यात ‘माजिर्न’चा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 12:55 IST

काळाबाजार : गुजरातेतील पेट्रोल सिमावर्ती गावांमध्ये 100 रुपये लीटर

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : एकीकडे नंदुरबारसह संपूर्ण राज्यात पेट्रोल, डिङोलच्या दरवाढीचा भडका उडाला आह़े तर दुसरकडे नंदुरबार व गुजरात राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांना पेट्रोल विक्रीच्या काळ्या बाजारात माजिर्नचा चटका सहन करावा लागत आह़े पेट्रोलमाफिया गुजरातेतील स्वस्त दरात मिळणारे पेट्रोल महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर तब्बल 100 रुपये लीटरप्रमाणे विक्री करीत आहेत़ त्यातून त्यांना साधारणत 10 रुपयांचे ‘माजिर्न’ मिळत आह़ेनंदुरबारात सध्या पेट्रोल, डिङोलचे दर गगनाला भिडले आहेत़ पेट्रोल 87 रुपये 17 पैसे तर, डिङोल 74 रुपये 74 रुपये 75 पैशांवर जाऊन पोहचले आह़े महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत गुजरातेत पेट्रोलच्या भावात साधारण 10 रुपयांची तफावत आह़े गुजरातेत पेट्रोल 77 रुपये 62 पैसे तर डिङोल 73 रुपये 12 पैसे दराने विकले जात आह़े महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातेत पेट्रोल स्वस्त आह़े त्यामुळे किरकोळ दुकानदार तसेच व्यावसायिकांकडून गुजरातेतील निझर येथून पेट्रोलचा साठा आणत नंदुरबारातील सीमावर्ती भागात तब्बल 100 रुपये लीटर दराने विकण्यात येत आह़े यातून त्यांना बक्कळ नफा मिळत असल्याचे त्याच्यांकडूनच सांगण्यात येत आह़े कॅन भरून आणले जाते पेट्रोलगुजरातेत पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त असल्याने येथील किराणा दुकानदार तसेच इतर छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांकडून थेट दुचाकी तसेच प्रवासी वाहनांव्दारे प्लॅस्टिकच्या कॅन भरून शेकडो लीटर पेट्रोल आणले जात असल्याचे दिसून येत आह़े अत्यंत धोकादायक पद्धतीने पेट्रोलची हाताळणी तसेच वाहतूक केली जात आह़े नंदुरबारातील सीमावर्ती भागात पेट्रोलचा मोठा काळाबाजार करण्यात येत असल्याने याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आह़े सीमावर्ती भागात पेट्रोलपंपाची संख्या कमी असल्याने परिणामी नंदुरबारच्या मध्यवर्ती भागात येण्याससुद्धा पेट्रोल लागत असत़े त्यामुळे वाहनधारकांकडून तेथीलच किराणा दुकानदारांकडून नाईलाजास्तव वाढीव दराने पेट्रोलची खरेदी केली जात आह़े एक लीटर पेट्रोलमागे व्यावसायिकांना साधारणत 10 ते 11 रुपयांचा नफा मिळत असतो़ त्यामुळे तो नफा मिळवण्यासाठी त्यांच्याकडून वाहनधारकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात येत असत़े एकीकडे बाटली, कॅनमध्ये पेट्रोल देण्यास मनाई असतानासुद्धा बहुतेक पेट्रोलपंप चालकांकडून ग्राहकांना बिनदिक्कतपणे कॅनमध्ये पेट्रोल दिले जात आह़े दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव वाढल्याने गुजरातेतील पेट्रोलची मागणी वाढली आह़े गेल्या 15 दिवसातच साधारणत 30 ते 40 टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात गुजरातेतील पेट्रोलला मागणी वाढल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात येत आह़े असे असले तरी महाराष्ट्रातील वाहनधारकांची त्यात चांगलीच लूट होत आह़े