लाेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील जयनगर येथील माहेर तर औरंगाबाद येथील सासर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रूपयांसाठी सासरच्यांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहादा पोलीसात गुन्हा दाखल आहे. मोनिका मनोज दाभाडे (ह.मु.जयनगर) असे विवाहितेचे नाव आहे. विविहिता मोनिका ह्या सासरी नांदत असताना माहेरुन पाच लाख रूपये आणून द्यावेत तसेच मुलबाळ होणार नसल्याचे सांगून पती मनोज सुभाष दाभाडे, सासू कल्पनाबाई सुभाष दाभाडे, सासरे सुभाष बाबुराव दाभाडे, दीन स्वप्नील, दीराणी प्रतिभा स्वप्नील दाभाडे, सर्व रा. औरंगाबाद, सासूची आई मिठाबाई भाऊराव साळूंखे रा. वाघाडी ता. शिरपूर व नणंद दिपाली रितेश शिंदे रा. कल्याण यांनी वेळोवेळी शारिरिक व मानसिक छळ केला. दरम्यान अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने काढून घेत माहेरी टाकून घातले. याप्रकरणी मोनिका यांच्या फिर्यादीवरुन सर्व सात संशयितांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार प्रमोद वळवी करत आहेत.
माहेरुन पाच लाख आणावेत यासाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:11 IST