शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जनधनचे पैसे आता गावातच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात पुढील दोन महिने ५०० रुपये अनुदान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात पुढील दोन महिने ५०० रुपये अनुदान जमा होणार असून प्रत्येक महिन्यात जमा होणारी रक्कम त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या १५० व बँक अधिकृत ग्राहक सेवेचे १७२ केंद्राद्वारे घरपोच मिळणार आहे.योजनेअंतर्गत जनधन बँक खातेधारक महिलांना एप्रिल महिन्याचे अनुदान वितरीत करण्यात आले असून मे आणि जून महिन्यातदेखील अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असल्याने प्रशासनामार्फत सर्व इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर व शहरात वॉर्डनिहाय सेवा देण्यात येत आहे.जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकची १५० सेवा केंद्र आहेत. तसेच बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांची संख्या १७२ आहे. या सर्वांची यादी तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांचेकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील व वॉडार्तील लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पैसे वाटपाचे वेळापत्रक ठरविण्यात येईल. ग्राहकांना जाहीर दवंडीद्वारे पैसे मिळण्याचा दिवस कळविण्यात येईल. कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत आधार लिंक खाते असलेले सर्व ग्राहक या दोन्ही सेवांच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. त्यासाठी ग्राहकांनी आपले आधार कार्ड आणि मोबाईल सोबत न्यावे. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नसल्याने त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहे. धुळे-नंदुरबार पोस्टाचे वरीष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट पेमेंटचे काम होणार आहे. पैसे वाटप करताना एकावेळी ४ ते ५ ग्राहकांना परवानगी देण्यात येईल व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल.ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांना काऊंटरपासून एक मीटर दूर उभे रहावे. ग्राहक सेवा केंद्रांना आपली यंत्रे वेळोवेळी स्वच्छ करण्याच्या आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खातेधारक ग्राहकांना या सेवा केंद्रातून पैसे काढण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. एकावेळी जास्तीत जास्त हजार रुपये काढता येतील. जिल्हास्तरावर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे प्रमोद पाटील आणि पोस्ट पेमेंट बँक व्यवस्थापक योगेश शिंदे हे काम पाहतील. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन बँकेतील गर्दी टाळावी. जवळील पोस्ट कार्यालय व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.नागरिकांचा वेळ व श्रम वाचावे आणि बँकेतील गर्दी टाळण्यासाठी अशाप्रकारचे नियोजन करती आहोत. ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य माहिती देण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मोठे गाव असल्यास एकापेक्षा जास्त प्रतिनिधी पाठविण्याची व्यवस्था करण्याच्या सुचनादेखील पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत व्यापारी बँकेमार्फत २ कोटी ३ लाख रुपये पोस्ट पेमेंटद्वारे वितरीत.पोस्ट पेमेंट बँकेची सुविधा असलेल्या ठिकाणी व परिसरातील ३ ते ४ इतर गावात वेळापत्रकानुसार अनुदान वितरण होणार.इंटरनेट कनेक्टीव्हीटी असलेल्या गावात सुविधा.तलाठी, ग्रामसेवक एका दिवसातील लाभार्थी संख्या ठरविणार.एका दिवसात एका प्रतिनिधीकडून जास्तीत जास्त २५ हजार रुपयांचे वाटप.लाभार्थी पुर्ण होईपर्यंत संबधित गावात वितरण सुरू राहाणार.मोठे गाव असल्यास एकापेक्षा अधिक प्रतिनीधीचे नियोजन.एका ग्राहक सेवा केंद्राला (टच पॉईंट) तीन ते चार गाव जोडणार.ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने निश्चित केलेल्या जागेवर वितरण होणार.