प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे म्हणाले, तालुक्यात २३ जुलैनंतर कोविडचा रूग्ण आढळला नाही ही समाधानाची बाब आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने उत्साहात साजरा करावा. तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव होऊ नये यासाठी सर्वांनी सावधगिरी बाळगावी.
बैठकीला प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, वीज वितरण कंपनीचे अभियंता सुजित पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, बसस्थानक प्रमुख संजय कुलकर्णी, डॉ. मणिलाल शेल्टे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरूण चौधरी, सुपडू खेडकर, अनिल भामरे, अशोक मुकरंदे, अशोक टिला पाटील, रामचंद्र पाटील, डॉ. योगेश चौधरी, डाॅ. किशोर पाटील, अरविंद कुवर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक म्हसावद पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे तर, आभार डॉ. मणिलाल शेल्टे यांनी मानले.
प्रशासनाने केलेल्या आवाहनाला तालुक्यातील लोणखेडा, सारंगखेडा, म्हसावद, वडाळी, कळंबू, मंदाणे या गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे एम.के. गणेश मंडळ, हिंदवीर गणेश मंडळ, चौधरी मित्र मंडळ यांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय बैठकीत जाहीर केला. पोलीस व महसूल विभागाने प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचे कौतुक केले.