शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

परीक्षांच्या नवीन वेळापत्रकाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लेखनी बंद आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लेखनी बंद आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १ आक्टोंबर पासून सुरू होणाºया अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या तातडीने झालेल्या बैठकीत आधीच जाहीर झाला आहे.पदवीच्या अंतीम वर्षाच्या परीक्षांना १ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार होती. त्यादृष्टीने तयारीही करण्यात आली होती. विद्यार्थी देखील परीक्षेसाठी सज्ज झाले होते. परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंदमुळे हा परीक्षा आता १ आॅक्टोबर रोजी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.कुलगुरू पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची आॅनलाईन बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या सर्व सदस्यांचे मत जाणून घेण्यात आले.२४ सप्टेंबर पासून राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखनी, अवजार बंदसह ठिय्या आंदोलन पुकारले आहे. तसेच १ आॅक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या सहा दिवसांपासून परीक्षांबाबतची सर्व कामे ठप्प झाली आहेत.या परिस्थितीत आॅफलाईन व आॅनलाईन परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या परीक्षा तुर्त पुढे ढकलाव्यात अशी सर्व सदस्यांनी एकमताने भावना व्यक्त केली. कर्मचाºयांच्या सहकार्याशिवाय या परीक्षा घेणे शक्य नाही असेही मत सदस्यांकडून मांडण्यात आले.अखेर कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांनी सर्व सदस्यांचे मत जाणून या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले व परीक्षेच्या पुढील तारखा व नवीन वेळापत्रक आंदोलनाची परिस्थिती पाहून जाहीर केले जाईल असे सांगितले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली. या बैठकीत प्र-कुलगुरू, सर्व अधिष्ठाते, सहयोगी अधिष्ठाते व सदस्य उपस्थित होते.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखनी बंद आंदोलनाबाबत राज्यस्तरावरून आज काही घडामोडी होतात किंवा कसे यावर परिक्षांचा निर्णयही अवलंबून होता. परंतु लेखनीबंद कायम असल्यामुळे परीक्षा होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक कधी जाहीर होते याकडे आता विद्यार्थी, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे.