शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्ल्यू सदृष्य आजारांचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:52 IST

दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला : सिव्हीलसह खाजगी रुग्णालयातही गर्दी

नंदुरबार : शहरात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत गेल्या आठ दिवसांपासून झपाटय़ाने वाढ झाली आहे. अनेक खाजगी रुग्णालयात तसेच जिल्हा रुग्णालयात देखील या आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल दोन रुग्णांचे रक्त, लघवीचे सॅम्पल पुण्याला पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, जनतेने काळजी घ्यावी, लक्षणे आढळून आल्यास लागलीच उपचार घ्यावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी केले आहे.वातावरणातील उष्मा आणि आद्रता वाढल्याने गेल्या आठ दिवसांपासून साथीच्या आजारांची मोठय़ा प्रमाणावर लागण झाली आहे. तीव्र ताप येणे, थकवा येणे, भूख न लागणे, खोकला आणि गळा खवखवणे आदी आजारांचे रुग्ण वाढले आहेत. नेहमीच्या साथीच्या आजाराची रुग्ण म्हणून त्याकडे पाहिले जात होते. परंतु जिल्हा आरोग्य प्रशासन आणि खाजगी डॉक्टरांना देखील शंका आल्याने काहींनी स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असल्याचे निदान करीत त्यानुसार उपचारांना सुरुवात केली. काहींचे रक्त व लघवीचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत देखील पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. नवरात्रोत्सवामुळे फैलावले?नवरात्रोत्सवात अनेकजण सुरत, अहमदाबाद, बडोदा याशिवाय पुणे येथे गेलेले होते. तेच लोकं येथे आल्यावर यात्रा किंवा इतर कार्यक्रमांमध्ये सामिल झाल्याने साथ फैलावल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात अशा प्रकारचे लक्षणे ही वातावरणातील बदलामुळे देखील निर्माण होतात. परंतु गेल्या आठ दिवसांपासून येणा:या रुग्णांना सारखेच लक्षणे आढळून येत असल्यामुळे जिल्हा रुग्णालय आणि खाजगी डॉक्टर देखील सतर्क झाले. त्यांनी स्वाईन फ्ल्यूवरील उपचार   अशा रुग्णांवर वेळीच सुरू केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा दावा एका खाजगी डॉक्टरांनी      केला. जिल्हा रुग्णालयातही रुग्णस्वाईन फ्ल्यू सदृष्य लक्षणे असलेल्या आजाराची रुग्ण जिल्हा रुग्णालयात देखील मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. दाखल रुग्णांपैकी दोन रुग्णांचे सॅम्पल पुणे येथे पाठविण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांनी सांगितले. अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. परंतु त्यांना ‘स्वाईन फ्ल्यू’च आहे किंवा नाही हे सॅम्पल तपासणीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जिल्हा रुग्णालयात आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध आहे असेही त्यांनी   सांगितले.